आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 11:26 AM2022-08-14T11:26:03+5:302022-08-14T11:26:27+5:30

President : राष्ट्रपतींसाठी सर्वात सुरक्षित गाडी नियुक्त केली गेलेली असते. पाहू या कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती...

Which car does the President use? | आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती? 

आरामदायी आणि सर्वात सुरक्षित अशी कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती? 

Next

राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावरील व्यक्ती तीनही सेनादलांची प्रमुख असते. त्यामुळे त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवलेली असते. त्यामुळेच राष्ट्रपतींसाठी सर्वात सुरक्षित गाडी नियुक्त केली गेलेली असते. पाहू या कोणती गाडी वापरतात राष्ट्रपती...

मुर्मु यांना सर्वोच्च सुरक्षा
देशाच्या राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मु यांची नुकतीच निवड झाली.
त्या देशाच्या १५ व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या मुर्मु यांना अधिकृत अध्यक्षीय वाहन म्हणून मर्सिडीझ-बेन्झ एस६०० ही गाडी देण्यात आली आहे.

गोपनीयता...
राष्ट्रपतींची गाडी कुठे तयार केली जाते, तिचा मॉडेल आणि रजिस्ट्रेशन नंबर वगैरे माहिती गोपनीय ठेवली जाते.त्यावर लायसन्स प्लेट नसते. अशोक स्तंभाचे चिन्ह त्यावर असते.

कोणत्या राष्ट्रपतींनी कोणती गाडी वापरली?
प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात मर्सिडीझ-बेन्झ एस-क्लास डब्ल्यू१४० ला अद्ययावत करून तिचे रूपांतर डब्ल्यू२२१ एस-क्लास एस६०० पुलमॅन लिमोझिनमध्ये करण्यात आले.
डॉ. अब्दुल कलामांच्या कार्यकाळात मर्सिडीझ-बेन्झ एस-क्लास डब्ल्यू१४० ही गाडी वापरली जायची.
बुलेट आणि ग्रेनेड प्रूफ गाडीचा वापर सर्वप्रथम शंकरदयाल शर्मा यांनी त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात केला.

अत्यंत सुरक्षित गाडी
अत्यंत आरामदायी आणि सर्वात सुरक्षित असा मर्सिडीझ-बेन्झ एस६००चा लौकिक आहे.
बॉम्बरोधक असलेल्या या गाडीवर एके-४७ने गोळ्या झाडल्या तरी आतील प्रवासी सुरक्षित राहतो.
याशिवाय गाडीच्या टायरमधील हवा निघाली तरी ती पळू शकते, आग विझवू शकणारी यंत्रणाही या गाडीत असते.

मर्सिडीझ-बेन्झ एस६००ची वैशिष्ट्ये
ही पुलमॅन गार्ड लिमोझिन गाडी आहे. मर्सिडीझ-बेन्झ एस६००ची किंमत ₹९कोटी रुपये आहे. 

Web Title: Which car does the President use?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.