ऑनलाइन व्यवहारांसाठी कोणते कार्ड वापरावे?; सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य खबरदारी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:55 AM2022-03-15T07:55:06+5:302022-03-15T07:55:26+5:30

आपण डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते पाहणे योग्य ठरेल.

Which card to use for online transactions ?; Proper precautions are required for cyber security | ऑनलाइन व्यवहारांसाठी कोणते कार्ड वापरावे?; सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य खबरदारी आवश्यक

ऑनलाइन व्यवहारांसाठी कोणते कार्ड वापरावे?; सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य खबरदारी आवश्यक

Next

दरवर्षी जगभर १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जात असतो. यावर्षीच्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्यादृष्टीने डिजिटल व्यवहारांमधली सुरक्षितता हा विषय निवडण्यात आला आहे. डिजिटल फायनान्समुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मागे राहण्याची शक्यता असते. 

आपल्या भोवतालच्या आर्थिक व्यवहारांच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेले आहेत. संगणकीय प्रणालीच्या आधारे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढायला लागले आहे. इतर पद्धतींमध्ये व्यवहारांमधले दोन्ही पक्ष एकमेकांना माहिती असतात, प्रसंगी ते एकमेकांच्या समोरदेखील असतात. डिजिटल व्यवहारांमध्ये मात्र ते एकमेकांच्या समोर नसतात, प्रसंगी ते विश्वासार्ह देखील नसतात. अशावेळी सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर आपण डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते पाहणे योग्य ठरेल. आपली आर्थिक विवरणे नियमितपणे तपासणे आवश्यक मानले पाहिजे. आपण ज्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून व्यवहार करणार आहोत, त्यासाठी सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी आवश्यक ठरते. 

अलीकडच्या व्यवहारात लॉग इन आणि व्यवहारासाठीचा असे दोन पासवर्ड्स, कापचा, तसेच आपल्या रजिस्टर्ड  मोबाईलवर येणारा वनटाईम ओटीपी अशा प्रकारच्या अनेक सुरक्षाप्रणाली वापरलेल्या असतात. आपले पासवर्ड्स आपण वरचे वर बदलले पाहिजेत. 
आपण आपले व्यवहार करण्यासाठी जे ॲप्स वापरतो आहोत, ते भरवशाचे आणि खात्री असणारे असावेत. ज्या खात्यावर जास्त शिल्लक रक्कम असते, त्या बँक खात्याशी भीम किंवा पेटीएमसारखे ॲप्स लिंक करू नयेत. शक्यतोवर डेबिट कार्डाचा वापर करू नये.

क्रेडिट कार्डाला मर्यादित रकमेचे बंधन असते. त्यामुळे कार्ड हॅक झाले किंवा त्याचे क्लोनिंग झाले, तर धोका कमी असतो. अनेकदा बँकांच्या नावाने फोन येतो आणि आपल्याला खात्याचा पिन नंबर, पासवर्ड मागितला जातो.  कोणतीही बँक आपल्या खातेदारांकडून त्यांच्या बँक खात्याबद्दलची गोपनीय स्वरूपाची माहिती कधीही मागवीत नाही. आपण सावध राहिलो, तरच त्यातून आपण वाचू शकतो. आजच्या ग्राहक दिनाचा हाच संदेश आहे.

Web Title: Which card to use for online transactions ?; Proper precautions are required for cyber security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.