कोणत्या शहरात निवडणूक राेख्यांची सर्वाधिक खरेदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:50 AM2024-03-27T11:50:13+5:302024-03-27T11:50:51+5:30
हैदराबाद येथे ८५दिवसांत २४८ कंपन्या/व्यक्तींनी १२ राजकीय पक्षांसाठी ३५१० रोखे (२९१९ कोटी रु.) खरेदी केले.
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना निवडणूक निधी मिळण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या निवडणूक रोखे योजनांमध्ये देशातील प्रमुख महानगरांमधून किती रुपयांचे किती राेखे खरेदी करण्यात आले आणि किती राेखे वटविले, यासंदर्भात माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ७८ दिवसांत १९५ कंपन्या/व्यक्तींनी ११ राजकीय पक्षांसाठी ३४२० निवडणूक रोखे (२७२० कोटी रु.) विकत घेतले. त्यापैकी १६३ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मुंबईतच तर २५५७ कोटी रुपयांचे रोखे इतर शहरात वठविण्यात आले.
हैदराबाद येथे ८५दिवसांत २४८ कंपन्या/व्यक्तींनी १२ राजकीय पक्षांसाठी ३५१० रोखे (२९१९ कोटी रु.) खरेदी केले. यापैकी १२९० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे याच शहरात, तर १६२९ कोटींचे रोखे इतर शहरात वठविण्यात आले.
देशातील प्रमुख महानगरे आघाडीवर, आर्थिक राजधानी मुंबईत प्रमाण सर्वात जास्त
निवडणूक रोखे व्यवहाराचे रोखे एकूण एकूण रक्कम लाभार्थी रोखे वटविले रोखे वटविले टक्के मुदत
खरेदीचे शहर दिवस खरेदीदार रोखे (कोटींमध्ये) पक्ष त्याच शहरात दुसऱ्या शहरात संपलेले
हैदराबाद ८३ २४८ ३५१० २९१९ १२ १२९० १६२९ ५५.८% ०.०००
मुंबई ७८ १९५ ३४२० २७२० ११ १६३ २५५७ ९४% ३.४०१
कोलकाता १०८ ३४८ ५४२० २४३२ १३ ९२८ १५०५ ६१.९% १.०८१
नवी दिल्ली ८७ २०१ २६२३ १६८३ १५ १३२८ ३५६ २१.१% ०.३०१
चेन्नई ४० २९ १४०२ १३४० १० ४७९ ८६१ ६४.३% ३.०००
गांधीनगर ३८ ४६ ९०० ४६२ ९ २ ४६१ ९९.६% १.७५०
बंगळुरू २३ ४५ ३५५ १४४ ६ ० १४४ १००% ०.०००३
भुवनेश्वर १६ १४ १८३ १३६ ३ ८२ ५४ ३९.६% ०.०००
जयपूर २३ ३४ २०४ १०२ ४ ० १०२ १००% ०.०००
लखनऊ ८ ६ १०२ ५४ ३ ०.२ ५४ ९९.६ ०.०००
चंडीगड १५ १७ १५० ५२ ४ ६ ४६ ८८.९% ०.०००
पणजी १३ १५ ३१९ २८ ८ १ २७ ९६.५% ०.१००
तिरुवअनंतपुरम ४ ४ ४६ २६ ३ ० २६ १००% ०.०००
भोपाळ ५ ७ ६० १८ २ ० १८ १००% ०.०००
रायपूर ८ ७ ३४ १५ २ ०.००२ १४.८ ९९.९८% ०.००३
गुवाहाटी ४ ९ ७० १० ३ ० १० १००% ०.०००
विशाखापट्टणम ३ ४ ६० ७ २ ० ७ १००% ०.०००
रांची २ २ ५ ५ १ ५ ० ०.०% ०.०००
पाटणा १ १ ८ १ २ ० ० ५०% ०.०००
एकूण १४६ १२१३ १८८७१ १२१५६ २३ ४२८३ ७८७३ ६४.८% ९.६३५
आगरतळा, ऐझॉल, डेहराडून, गंगटोक, कोहिमा, इम्फाळ, इटानगर, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेतून एकही निवडणूक रोख्याची खरेदी करण्यात आली नाही.