वाजपेयींना कोणतं औषध देऊन घरी बसवलं ?- लालू प्रसाद यादव

By admin | Published: February 21, 2017 04:31 PM2017-02-21T16:31:04+5:302017-02-21T16:31:04+5:30

अटल बिहार वाजपेयींना कोणतं औषध देऊन घरी बसवण्यात आलं, याची चौकशी झाली पाहिजे.

Which medicine did Vajpayee sit at home? - Lalu Prasad Yadav | वाजपेयींना कोणतं औषध देऊन घरी बसवलं ?- लालू प्रसाद यादव

वाजपेयींना कोणतं औषध देऊन घरी बसवलं ?- लालू प्रसाद यादव

Next

ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 21 - उत्तर प्रदेश निवडणुकीतल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवही उत्तर प्रदेशमध्ये सपा-काँग्रेस आघाडीचा प्रचार करण्यासाठी आले असताना त्यांनी भाजपासह विरोधकांवर टीका केली आहे. अटल बिहार वाजपेयींना कोणतं औषध देऊन घरी बसवण्यात आलं, याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना या परिस्थितीत कोणी पोहोचवलं, हे सर्वासमोर आलं पाहिजे, असं लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अच्छे दिनचं काय झालं. नोटाबंदीमुळे बँकेच्या रांगेत लोकांचा जीव गेला तरीही मोदी सरकारनं काही केलं नाही. मायावती सरकार असताना पोलीस अ‍ॅक्ट लावून अत्याचार करत होती. मायावतींनी यादवांवर खूप अत्याचार केलेत. मायावतींनी भाजपाच्या समर्थनानेच मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मोदी हे हुकूमशहा झाले आहेत. नरेंद्र मोदी हे भारताचे ट्रम्प असून, समाजांमध्ये विष पेरण्याचं ते काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  

यावेळी लालू प्रसाद यादवांनी सपामधल्या कलहावरही भाष्य केलं आहे. यादवांचं रक्त गरम असल्यानंच त्यांना लढाई करण्यासाठी कोणी न मिळाल्यास ते एकमेकांशी युद्ध छेडतात, असंही ते म्हणाले आहेत. तसेच सोनिया गांधींवरही त्यांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. 

Web Title: Which medicine did Vajpayee sit at home? - Lalu Prasad Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.