सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कोणत्या टप्प्यात? सहाव्या टप्प्यात प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:32 AM2024-05-17T08:32:13+5:302024-05-17T08:34:04+5:30
या सर्व उमेदवारांकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या आतापर्यंत ७० टक्के मतदारसंघात मतदान झाले असून, केवळ तीन टप्पे शिल्लक राहिले आहेत. पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यापैकी सहाव्या टप्प्यात सात राज्यांतील ५७ जागांसाठी एकूण ८६९ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांकडे सरासरी ६.२१ कोटींची संपत्ती आहे.
पहिल्या पाच टप्प्यांच्या तुलनेत सहाव्या टप्प्यात एकूण कोट्यधीश उमेदवारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ३९ टक्के आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे.
उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
साधारण गुन्हे १८०
गंभीर गुन्हे १४१
महिलांविषयक गुन्हे २४
खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे २१
द्वेषपूर्वक विधान केल्याचे गुन्हे १६
खुनाशी संबंधित गुन्हे ६
सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार
नाव मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्ती
नवीन जिंदाल कुरुक्षेत्र (हरयाणा) भाजप १,२३० कोटी ११ कोटी १,२४१ कोटी
संतृप्त मिश्रा कटक (ओडिशा) बीजेडी ४२० कोटी ६२ कोटी ४८२ कोटी
सर्वात कमी संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार
मास्टर रणधीर सिंह रोहतक (हरयाणा) अपक्ष २ रुपये ० रुपये २ रुपये
राम कुमार यादव प्रतापगड (यूपी) एसयूसीआय १,६८६ रुपये ० रुपये १,६८६ रुपये
खिलखिलाकार वायव्य दिल्ली (दिल्ली) बीएसएसएसएसपी २,००० रुपये ० रुपये २,००० रुपये
राज्यनिहाय कोट्यधीश उमेदवार
हरयाणा १०२ (४६%)
ओडिशा २८ (४४%)
दिल्ली ६८ (४२%)
बिहार ३५ (४१%)
उत्तर प्रदेश ५९ (३६%)
झारखंड २५ (२७%)
प. बंगाल २१ (२७%)