कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:34 AM2021-06-29T10:34:45+5:302021-06-29T10:35:34+5:30
उत्पादनात ज्याची आघाडी, तोच लसीकरणातही पुढे
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली : देशात लसीकरण मोहीम सुरू होऊन आता सहा महिने झाले. या कालावधीत आतापर्यंत ३१.३६ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक वाटा सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या लसीचा आहे. कोविशील्डला पसंती लाभत असून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला सावध प्रतिसाद मिळत आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला मात्र कोणी विचारत नसल्याचे चित्र आहे.
कोव्हॅक्सिन
n भारत बायोटेकने मे-जूनपर्यंत कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन २ कोटींवरून दरमहा ५ कोटी करण्याचे आश्वासन दिले होते.
n प्रत्यक्षात मात्र गेल्या सहा महिन्यांत कोव्हॅक्सिनचे ४ कोटी डोस प्राप्त झाले. याचा अर्थ दरमहा सरासरी ७० लाख डोस उपलब्ध झाले.
n १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अजूनही कोव्हॅक्सिन लसीचे डोस वापरलेले नाहीत.
n मुंबई, भुवनेश्वर, गुजरात आणि इतरत्र कोव्हॅक्सिन लसीची उत्पादने सुरू करण्याचा भारत बायोटेकचा
प्रयत्न आहेत.
कोविशिल्ड
n सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्डचे आतापर्यंत २८ कोटी डोस वितरित झाले आहेत. याचाच अर्थ दरमहा ४ कोटी ६६ लाख डोस उपलब्ध होत आहेत.
n जुलै महिन्यात कोविशील्डचे ३४ कोटी तर कोव्हॅक्सिनचे ८ कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे.