धक्कादायक! देशभक्तीपर गीत गाताना महिलेला आला हार्ट अटॅक; खुर्चीवरून पडल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 04:40 PM2024-08-17T16:40:03+5:302024-08-17T16:40:54+5:30
देशभक्तीपर कार्यक्रमादरम्यान एका महिलेला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुजरातमधील भुज येथे देशभक्तीपर कार्यक्रमादरम्यान एका महिलेला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. महिला एका देशभक्तीपर कार्यक्रमात आपलं गाणं सादर करत होती. याच दरम्यान ती अचानक खुर्चीवरून खाली पडली. लोकांनी तातडीने महिलेला रुग्णालयात नेलं. मात्र त्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमुचस्वामी नगरमध्ये वृक्ष मित्र संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही घटना घडली. येथे आरती बेन राठोड नावाची महिला एका देशभक्तीपर कार्यक्रमात गाणं सादर करत होत्या. खुर्चीवर बसून गाणं गात होत्या. त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला.
कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. आरती खुर्चीवरून पडताच लोकांनी त्यांना उचललं आणि तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र आरती यांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आरती यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हार्ट अटॅकची अनेक प्रकरणं नोंदवली जात आहेत. कोरोना महामारीचा लोकांच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि नैराश्य वाढणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीही लोकांमध्ये वाढल्या आहेत. २०२३ च्या आकडेवारीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की, केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत विशेषतः कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.