Court: कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच चौघांनी प्राशन केले फिनाईल, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:40 PM2023-06-15T19:40:36+5:302023-06-15T19:44:09+5:30

Court News: कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना चार जणांनी फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायाधीशांसमोर सुनावणी असतानाच या चार जणांनी कोर्टरूममध्येच फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

While the court hearing was going on, the four prayed before the judge, after which... | Court: कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच चौघांनी प्राशन केले फिनाईल, त्यानंतर...

Court: कोर्टात सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोरच चौघांनी प्राशन केले फिनाईल, त्यानंतर...

googlenewsNext

गुजरात हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना चार जणांनी फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायाधीशांसमोर सुनावणी असतानाच या चार जणांनी कोर्टरूममध्येच फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. राज्यात आता न्यायासाठी लोकांना विष प्राशन करावं लागणार आहे का, असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. दरम्यान, हायकोर्टामध्येच ही घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्थेचं पितळही उघडं पडलं आहे. हायकोर्टात हे लोक बंदी असलेल्या वस्तू घेऊन पोहोचले कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.

गुजरात हायकोर्टातील न्यायमूर्ती निर्जर देसाई यांच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. या सुनावणीची लाईव्ह स्टिमिंगही सुरू होती. कोर्टरूममध्येही बऱ्यापैकी गर्दी होती. त्याचवेळी चार व्यक्चींनी फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि वकिलांनी पकडेपर्यंत त्यांनी फिनाईल प्राशन केलं होतं. या प्रकारामुळे कोर्टरूममध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार फिनाईल प्राशन केलेल्या व्यक्तींनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र मध्यस्थाने ते पैसे हरवले होते. मात्रा बँक त्यांना त्रास देत होती. या प्रकरणी त्यांनी जबाबदार लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या लोकांना जामीन मिळाल्याने हताश होऊन या कुटुंबाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान, हे लोक कोर्टात पोहोचले होते. दरम्यान, या व्यक्तींनी फिनाईल प्राशन केल्याने न्यायाधीशांनाही धक्का बसला. ते कोर्टरूममधून उठून गेले. त्यामुळे काहीकाळ सुनावणी ठप्प झाली. कोर्टात फिनाईल प्राशन करणाऱ्या व्यक्तींची ओळख शैलेशभाई ईश्वरभाई पांचाल, जयश्रीबेन शैलेशभाई पांचाल, मनोजभाई नथुभाई वैष्णव,  हार्दिकभाई अमरभाई पटेल अशी पटली आहे. पोलिसांनी फिनाईलची बाटली आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.  

Web Title: While the court hearing was going on, the four prayed before the judge, after which...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.