...तर लोकसभा कामकाज रविवारीही चालवले जाईल; लोकसभाध्यक्ष बिर्लांचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:07 AM2024-12-04T06:07:19+5:302024-12-04T06:07:38+5:30
राज्यघटना समितीने राज्यघटनेचा मसुदा स्वीकारल्याच्या घटनेच्या ७५ वर्षानिमित्त संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.
नवी दिल्ली : लोकसभा तहकूब झाल्याने कामकाज आणखी विस्कळीत झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठी रविवारी देखील सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विचार केला जाईल, असा इशारा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी सदस्यांना दिला.
राज्यघटना समितीने राज्यघटनेचा मसुदा स्वीकारल्याच्या घटनेच्या ७५ वर्षानिमित्त संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानसार संसदेत १३ व १४ डिसेंबर रोजी लोकसभेत व १६ व १७ डिसेंबर रोजी राज्यसभेत चर्चा होणार आहे. तसे सरकार व विरोधी पक्षांनी सोमवारी ठरविले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभागृहाची बैठक सुरू होणार आहे.
विरोधकांमुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागल्यास आठवड्याअखेर शनिवार, रविवारीदेखील सभागृह सुरू ठेवण्यात येईल. त्या कामकाजाला सदस्यांना उपस्थित राहावेच लागेल.
अदानी उद्योग समूहावर झालेले आरोप, उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेला हिंसाचार व अन्य मुद्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेत गेल्या आठवड्यात फारसे कामकाज होऊ शकलेले नाही.
चांगल्या संबंधांसाठी सीमेवर शांतता हवी
भारत-चीन संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आणि गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान झालेली चकमक याबाबत जयशंकर यांनी देशाची भूमिका मांडली. २०२० पासून सुरू असलेला दोन्ही देशांतील तणाव कमी व्हावा म्हणून भारताने पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले.