...तर महिलांना महिन्याला २,५०० रुपये: तेजस्वी यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 10:32 IST2024-12-16T10:32:29+5:302024-12-16T10:32:45+5:30
डॉ. शकील अहमद खान यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये जागावाटपात काँग्रेसला ७० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिकच्या जागांबाबत चर्चा होईल.

...तर महिलांना महिन्याला २,५०० रुपये: तेजस्वी यादव
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी दरमहा २,५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सरकार स्थापन करण्याची लढाई आधी लढली पाहिजे, असे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे.
याबाबत बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, पंचवीसशे रुपयेच काय; पण आणखीही देऊ शकतो, द्यायला हवे; पण आधी सरकार तर बनू द्या. काँग्रेसचे प्रभारी सचिव शाहनवाज आलम यांनी स्पष्ट केले आहे की, लोकसभा निवडणुकीतील स्ट्राइक रेटच्या आधारे जागा वाटप करण्यात येईल. डॉ. शकील अहमद खान यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये जागावाटपात काँग्रेसला ७० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिकच्या जागांबाबत चर्चा होईल.