कुजबुज.

By admin | Published: January 30, 2016 02:12 AM2016-01-30T02:12:39+5:302016-01-30T02:12:39+5:30

माड दामूचे आड येता ?

Whisper | कुजबुज.

कुजबुज.

Next
ड दामूचे आड येता ?
माडाला भाजपा सरकारने गवत घोषित केल्यापासून नागरिकांकडून टीकेला सामोरे जायला लागत असल्यामुळे भाजपा नेत्यांनी याची बरीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. काल मडगावात रवींद्र भवनात झालेल्या ‘सैम आनी रूखमारो’ या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात याची प्रचीती आली. रूखमारो म्हणजे झाडे मारणारा. पुस्तकातील रूखमारो लेखकाने सरकारला संबोधले आहे की काय? असा आपल्याला प्रश्न पडल्यामुळे आपण घाबरलो, असे दामू नाईक यांनी आपल्या भाषणात म्हटले. दामू नाईकांच्या आड माड येता म्हणून दामू घाबरला आहे, असे दामूच्या वक्तव्यावर भाष्य करताना खासदार नरेंद्र सावईकर यांनी म्हटल्यावर सभागृहात एकच खसखस पिकली.


दामूचे माड पुराण
दामू नाईकांनी माडाचा बराच धस्का घेतला की काय, असे आता वाटायला लागले आहे. काल मडगावच्या रवींद्र भवनात एका 3 डी कोकणी पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात बोलताना दामू नाईक यांनी माडावर मोठे प्रवचनच दिले. माड कसा लावला जातो, माड हे झाड नसून गवत कसे आहे याची मजेशीर माहिती दिली. दामूच्या म्हणण्याप्रमाणे जे जंगलात आपसुकच होते ते झाड व जे आपण प्रयत्न करून पेरतो ते झाड नव्हे. माड आपसूकच तयार होत नाही. माड लावण्यासाठी प्रयत्न करायला लागतात व आपण माड लावतो म्हणून माड हे झाड नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केल्याचे दामू नाईक यांनी सांगितले. दामूचे भाषण ऐकल्यावर सभागृहातील एक बुजूर्ग हळूच पुटपुटला. ‘अरे जे लावले जाते ते झाड नाही, तर मग आपण आंबा, फणस व इतर झाडेही स्वत:च लावतो म्हणजे तीपण झाडे नव्हे का? देवा तू पाव फाल्या आंबो आनी तण जायना जाल्यार पुरों,’ तो म्हातारा पुटपुटला.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.