कुजबूज
By Admin | Published: January 30, 2016 02:12 AM2016-01-30T02:12:34+5:302016-01-30T02:12:34+5:30
कुठे गेले पॅनल?
क ठे गेले पॅनल?विरोधी काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुका लढविल्या नव्हत्या. मग अकरा पालिकांच्याही निवडणुका लढविल्या नाहीत. मात्र, पणजी महापालिका निवडणुकीवेळी आम्ही समविचारी उमेदवारांचे पॅनल उभे करू किंवा समविचारी उमेदवारांना पाठिंबा देऊ, असे काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीर केले होते; पण असे ऐकिवात आहे की, पणजीत काँग्रेसला समविचारी उमेदवारच मिळत नाहीत. सुरेंद्र फुर्तादो व यतीन पारेख काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांचे विचार बाबूशच्या पॅनलमध्ये चपखल बसले आहेत. आता महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपली शक्ती दाखवायला हवी. त्यानिमित्ताने तरी पणजीत काँग्रेस सक्रिय होईल. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हेही महापालिका निवडणुकीवेळी काही डाव खेळतील, अशी चर्चा सुरू आहे. दिनार तारकर हेही पणजीतील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. माजी महापौर अशोक नाईक व आग्नेल सिल्वेरा काय करतात ते पाहुया.कंत्राटदार खुशसार्वजनिक बांधकाम खात्याची कामे घेण्यासाठी पूर्वीसारखी आता कंत्राटदारांची रांग लागत नाही. काही छोट्या कामांच्या निविदा तर वारंवार जारी कराव्या लागतात; कारण कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नाही. आपण काही वर्षांपूर्वी केलेल्या कामांची जुनी बिले अजून निकालात निघालेली नाहीत, असे कंत्राटदार गेल्या पंधरा दिवसांपर्यंत सांगत होते; पण आता बांधकाम खात्याने कंत्राटदारांना खुशखबर दिली आहे. गेल्या दहा दिवसांत बांधकाम खात्याने कंत्राटदारांची एकूण 52 कोटी रुपयांची बिले फेडली आहेत. आणखी तेवढय़ाच कोटींची बिले अनिर्णित असून तीही येत्या दि. 15 फेब्रुवारीपर्यंत निकालात काढण्याचे बांधकाम खात्याने ठरवले आहे. रस्ते, मलनिस्सारण, इमारत बांधकाम अशा अनेक कामांबाबतची ही बिले आहेत. चर्चिल आलेमाव बांधकाममंत्री असताना बहुतेक बिले पेंडिंग ठेवली जात होती. त्यामागची कारणे चर्चिल व वालंकालाच ठाऊक आहेत.