कुजबुज

By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:36+5:302015-10-03T00:20:36+5:30

पुंडलिका, वर दे.!

Whisper | कुजबुज

कुजबुज

Next
ंडलिका, वर दे.!
म्हापशातील लोकांना चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी येथील गांधी पुतळ्याजवळ भाजपने एक मोठी कमान उभारली आहे. मात्र, अकरा दिवसांचे गणपती विसर्जन होऊनही कमान काढण्याचे कोणी नाव घेत नाही. याला कारणही तसेच आहे म्हणे.. सध्या पालिका निवडणुकीची धामधुम सुरू आहे. या कमानीवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व म्हापशाचे भाजप मंडल अध्यक्ष रोहन कवळेकर यांचे फोटो आहेत. कवळेकर हे पालिका निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. मात्र, हा प्रकार आयरिश यांच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केल्यावर ही कमान हटविण्याचा आदेश उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत ही कमान हटविण्यात आली नव्हती; परंतु उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी दाखवलेले धाडस मात्र सध्या म्हापसेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

नियती आणि..!
वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचार प्रकरणात गाजत असलेले आत्माराम देशपांडे यांनी अखेर अंदमानमध्ये नव्या पदाचा ताबा घेतला खरा; परंतु तेथे त्यांना भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख बनविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देशपांडे यांना आयपीएस अधिकारी म्हणून बढती मिळूनही केवळ सरकारी आशीर्वादाने ते गोव्यात ठाण मांडून होते. अखेर त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागले. वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रातील घोटाळा काँग्रेसचे युवा नेते दुर्गादास कामत यांनी उघडकीस आणला. अर्थात त्यात पोलीस महानिरीक्षक व इतरांनी देशपांडे यांना क्लिन चीट दिली हा भाग वेगळा. अंदमानमध्ये नव्या ठिकाणी त्यांना कोणता विभाग दिला जातो याकडे सर्वांचेच लक्ष होते. तेथे लाचलुचपतविरोधी विभागाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली. नियती आपला चमत्कार दाखवत असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.