कुजबूज--४ मे-सद्गुरू
By admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:58+5:302015-05-05T01:20:58+5:30
प्रदीपची पार्टी
Next
प रदीपची पार्टीप्रदीप घाडी आमोणकर हे नाव कुणाला ठाऊक नाही असे नाही. मध्यंतरी त्यांनी मराठी राज्यभाषा व्हायला हवी म्हणून चळवळ चालवली. त्यांचे सहकारी ॲड. अजितसिंग राणे हे गेल्याच महिन्यात शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले व राज्यप्रमुख बनले. प्रदीप आमोणकर आता आम आदमी पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत. गोव्यात आम आदमी पक्षाच्या कामास अजून जोर चढलेला नाही. रेमो फर्नांडिसने लहर आली तेव्हा आम आदमी पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. ऑस्कर रिबेलो यांनी फावल्या वेळेत आम आदमी पक्षाचे काम करण्याचा प्रयत्न केला. राजन काकोडकर, वाघेला, वाल्मिकी नायक वगैरे मंडळींनी आम आदमी पक्षाचे आतापर्यंत गंभीरपणे काम केले आहे. पक्ष छोटा असला तरी, त्यात गट कमी नाहीत हे पणजीच्या पोटनिवडणुकीवेळीही दिसून आले. आता प्रदीपजी या पक्षातील कोणत्या गटात असतील ते कळत नाही.इजिदोर नसले तरी...काणकोण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यापुढे विधानसभा निवडणुकीवेळी कोण असतील ते स्पष्ट नाही. मात्र, माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांना आपणच उमेदवार असेन असे अगोदर वाटत होते. लुईिझन फालेरो हे प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून मात्र काणकोणमध्ये आणखीही उमेदवार तयार झाले. काणकोणमध्ये रविवारी जी सभा झाली, त्या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. इजिदोर फर्नांडिस त्या सभेला गेले नाहीतच. गट काँग्रेस अध्यक्षही गेले नाहीत. सभेपासून इजिदोरची सगळीच माणसे दूर राहिली. तरीही सभेला गर्दी झाली. म्हणजे काँग्रेससाठी नवे उमेदवार व नवे समर्थकही तयार झाले आहेत. प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव महादेव देसाई व इतरांनी मिळून सभा यशस्वी केली. आपल्याला अगोदर उमेदवार जाहीर करा, मग सभेचे आयोजन करतो, अशी अट म्हणे इजिदोरने घातली होती.