कुजबुज
By Admin | Published: January 30, 2016 02:12 AM2016-01-30T02:12:35+5:302016-01-30T02:12:35+5:30
दिवे लावले!
द वे लावले!वॉट्सअँपवरील स्टेटसचा विषय कुजबुज बनू शकतो की नाही, यावर भले उपसभापती विष्णू वाघ यांचे काहीही मत असो; परंतु सध्या विष्णू आणि माजी आमदार दामू नाईक यांच्या वॉट्सअँप स्टेटसने चर्चेला तोंड फोडले आहे. दामू आपल्या स्टेटसमध्ये असे लिहितात की, ‘दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वत:विषयी काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील! ’ दामूंनी हा सल्ला कोणाला दिलेला आहे माहीत नाही; परंतु विष्णूंच्या स्टेटसने खळबळ उडवून दिली आहे. ते लिहितात ‘ये भी खयाल रखना दिए जलाते वक्त, की बहोत से घरों में आज भी अंधेरा है!’ विष्णू यातून काय सांगायला शोधत आहेत याचा उलगडा अनेकांना झालेला असेल यात दुमत नाही. सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही, हेच खरे!