कुजबूज : संपादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:54+5:302016-01-06T01:51:54+5:30

अकादमीची घुसमट!

Whisper: Editor | कुजबूज : संपादक

कुजबूज : संपादक

googlenewsNext
ादमीची घुसमट!
कला अकादमीत ‘लोकोत्सव’ भरवल्याने संपूर्ण परिसर व्यापला जातो व अकादमीचा श्वास गुदमरत असल्याचे वृत्त काल आम्ही दिल्यानंतर तत्काळ अनेक प्रतिक्रिया आल्या. असे कार्यक्रम- तेही बिगर सांस्कृतिक- कला अकादमीत वर्षाकाठी सहा-सात तरी होतात. त्यासाठी हा परिसर बंद ठेवला जातो; परंतु कोणाचा श्वास गुदमरल्याचे उदाहरण नाही! विशेषत: इफ्फी दरवर्षी होतो. शिवाय इतकी वर्षे जेम्स अँँड ज्युवेलरी शो व्हायचा! त्यासाठी संपूर्ण कला अकादमी संकुलाचे आरक्षण केले जायचे. प्रॉपर्टी एक्स्पो सतत तीन दिवस चालतो. एक वृत्तपत्र बिगर सांस्कृतिक प्रदर्शनही भरविते. तर मग गोव्यातील सर्वात मोठा कला महोत्सव- ज्याच उद्देशाने अकादमी चालते, त्यावर एवढे अकांडतांडव का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर समजलेली माहिती मजेशीर आहे. या सात दिवसांत म्हणे, कला अकादमीच्या कर्मचार्‍यांना आपली वाहने संकुलाच्या बाहेर उभी करावी लागतात. परंतु इफ्फी होतो तेव्हाही वाहने बाहेर ठेवावी लागतातच की! शिवाय संकुलात आत प्रवेश घेण्यासाठी तेव्हा त्यांना ओळखपत्रही दाखवावे लागते. तेव्हाच आतमध्ये प्रवेश मिळतो! तज्ज्ञ मानतात, ‘श्वास गुदमरतो’ हा शब्दच राजकीय अर्थाचा आहे. कर्मचार्‍यांना त्याची लागण कधीपासून झाली?
------------
ग्लासांचे कवित्व!
माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्या घरातील एका समारंभात लुईझिन फालेरो व चर्चिल आलेमाव यांचे एकत्र येणे गोव्यातील प्रसार माध्यमांसाठी मोठी बातमी मिळवून देणारे ठरले याचे कारण या दोघांच्या ‘मनोमीलना’ची वार्ता बराच काळ हवेत उडत होती. त्यामुळे कॉँग्रेस बदलणार की 2012चीच आवृत्ती पुन्हा निघणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. त्यावर आता कॉँग्रेस पक्षातीलच तरुण तुर्क आणि तिसर्‍या आघाडीतील नेते तिखट बोलू लागले आहेत. फालेरो-चर्चिल एकत्र येणे म्हणजे आमची संधी गेली, असे त्यांना वाटते. त्यातील एकाने म्हटले की या दोन नेत्यांनी ग्लास उंचावले खरे; परंतु त्यात तरुणांच्या भावभावनांना कोठेच स्थान आहे असे दिसले नाही. कामत सरकार सत्तेवर होते तेव्हा त्या मंत्रिमंडळात दोन माजी मुख्यमंत्री होते. आताच्या कॉँग्रेसमध्ये सहा मुख्यमंत्री आहेत, म्हणजे तो अत्यंत ‘वजनदार’ पक्ष बनला आहे. परंतु पक्ष वजनदार बनतो तेव्हा तो आपल्याच वजनाने बुडण्याची अधिक शक्यता असते..

आणि शेवटी : बिस्मार्क मृत्यू प्रकरणामुळे सध्या कार्यकर्त्या मंडळींमध्येही वितुष्ट आले आहे आणि फेसबुकवर एकमेकांची उणीदुणी जाहीरपणे काढली जात आहेत. हल्लीच पणजी विधानसभेची निवडणूक लढलेल्या एका आयआयटीयनने बिस्मार्क प्रकरणात काही विधाने करताच, एक संपूर्ण गट त्याच्यावर चाल करून आला. निवडणूक खर्चाचा हिशेब येथपासून त्यांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप केले. एकमेकांना जनावरांची नावेही वाहिली. तरीही कार्यकर्त्यांचे हे रूप फेसबुकला नवे नव्हते. कारण, फेसबुकवर तेच तर चालले आहे!

Web Title: Whisper: Editor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.