कुजबूज - सरकारी जावई
By admin | Published: April 15, 2015 12:03 AM2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30
मडगावातील हॉस्पिसिओ इस्पितळात अल्ट्रासाउंड मशिन दर दोन दिवसांनी खराब होत असल्याचे मशिन ऑपरेट करणार्या ऑपरेटर्सकडून सांगितले जाते; परंतु असे का सांगितले जाते याची इस्पितळाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती खूपच गंमतीशीर निघाली, हा ऑपरेटर म्हणे उत्तर गोव्याचा असून तो मनाला वाटेल तसा वागतो कधीही वेळेवर ड्युटीवर येत नाही व आलाच तर मशिन खराब झाल्याचे कारण पुढे करून दुपारी दीड वाजताच निघून जातो. या ऑपरेटरवर कुणाचेही कंट्रोल नसल्याने त्याचे आयतेच फावते. हा ऑपरेटर आपण सरकारी जावई असल्यासारखा वागत असल्याची चर्चा इस्पितळाच्या आवारात सुरू आहे. आरोग्यमंत्री बदलला; पण हॉस्पिसिओची परवड काही थांबली नाही, हेच खरे.
Next
म गावातील हॉस्पिसिओ इस्पितळात अल्ट्रासाउंड मशिन दर दोन दिवसांनी खराब होत असल्याचे मशिन ऑपरेट करणार्या ऑपरेटर्सकडून सांगितले जाते; परंतु असे का सांगितले जाते याची इस्पितळाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती खूपच गंमतीशीर निघाली, हा ऑपरेटर म्हणे उत्तर गोव्याचा असून तो मनाला वाटेल तसा वागतो कधीही वेळेवर ड्युटीवर येत नाही व आलाच तर मशिन खराब झाल्याचे कारण पुढे करून दुपारी दीड वाजताच निघून जातो. या ऑपरेटरवर कुणाचेही कंट्रोल नसल्याने त्याचे आयतेच फावते. हा ऑपरेटर आपण सरकारी जावई असल्यासारखा वागत असल्याची चर्चा इस्पितळाच्या आवारात सुरू आहे. आरोग्यमंत्री बदलला; पण हॉस्पिसिओची परवड काही थांबली नाही, हेच खरे.आणि आता पत्रकयुद्ध...विधानसभा निवडणुकीला अजून किमान दीड वर्षांचा अवकाश आहे; पण कुंकळ्ळी मतदारसंघात आताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सोमवारी या स्तंभात आम्ही कुंकळ्ळीतील बॅनर युद्धाचा किस्सा प्रसिद्ध केला होता. या बॅनर युद्धाची सध्या खमंग चर्चा कुंकळ्ळीत चालू असतानाच मंगळवारी कुंकळ्ळीतून वितरित झालेल्या वृत्तपत्रातून ॲड. जॉन मोन्तेरो यांचे पत्रक कित्येकांच्या हाती पडले. मागच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवेळी कुंकळ्ळीचे माजी आमदार ज्योकिम आलेमाव आणि जॉन मोन्तेरो या दोघांनीही एका महिला उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यावरून जॉन आणि ज्योकिम जवळ आले, असा त्यांच्यावर आरोप केला होता. या पत्रकातून जॉनने आपल्यावरील आरोप खोडून काढला आहे आणि आपण अजूनही ज्योकिमच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. जॉन मोन्तेरो यांचे हे पत्र पुन्हा एकदा कुंकळ्ळीत चर्चेचा विषय बनले आहे; पण फक्त पत्रके काढली म्हणून मते पडतात का?