Coronavirus Omicron Variant: “कोरोना नियंत्रणासाठी नाइफ कर्फ्यू निरुपयोगी, शास्त्रीय आधारही नाही”: सौम्या स्वामीनाथन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 12:42 PM2022-01-01T12:42:32+5:302022-01-01T12:43:21+5:30

Coronavirus Omicron Variant: कोरोना नियंत्रणासाठी भारतासारख्या देशाने नेमके काय करावे? याबाबत सौम्या स्वामीनाथन यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

who chief scientist soumya swaminathan said no scientific reason behind night curfew in india | Coronavirus Omicron Variant: “कोरोना नियंत्रणासाठी नाइफ कर्फ्यू निरुपयोगी, शास्त्रीय आधारही नाही”: सौम्या स्वामीनाथन

Coronavirus Omicron Variant: “कोरोना नियंत्रणासाठी नाइफ कर्फ्यू निरुपयोगी, शास्त्रीय आधारही नाही”: सौम्या स्वामीनाथन

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यापूर्वीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरण्यासाठी नाइट केंद्रातील मोदी सरकारने नाइट कर्फ्यू लावण्याबाबत राज्यांना निर्देश दिले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ (WHO) डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी कोरोना रोखण्यासाठी किंवा कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाइट कर्फ्यूचा उपयोग नसून, त्याला शास्त्रीय आधारही नाही, असे सांगितले आहे. 

सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारतासारख्या देशाने नेमके काय करावे? याबाबत मोलाचा सल्लाही दिला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये करोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना डॉ. स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात, नाईट कर्फ्यू का उपयोगी नाही, याविषयी भूमिका मांडली आहे.

नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही

नाइट कर्फ्यूला कोणताही आधार नाही. कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी विज्ञानावर आधरित, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवे, असे स्वामीनाथन म्हणाल्या.

भारतात ओमायक्रॉन प्रसाराची ही फक्त सुरुवात

भारतात ओमायक्रॉनच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. मला वाटते ही फक्त सुरुवात आहे. फक्त काही शहरांमध्ये ओमायक्रॉनबाधित आढळत आहेत. पण पुढे जाऊन मोठ्या लोकसंख्येला ओमायक्रॉनची बाधा होण्याची शक्यता आहे, असा इशारा स्वामीनाथन यांनी यावेळी बोलताना दिला. तसेच जाहीर कार्यक्रमांमुळे, मनोरंजनाच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणे हे साहजिक आहे. भारतीयांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहायला हवे, असेही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात २२ हजार ७७५ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ४०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांचा आकडा आता १४३१ इतका झाला आहे. देशात सध्या १ लाख ४ हजार ७८१ अॅक्टिव केसेस असून रिकव्हरी रेट ९८.३२ टक्के इतका आहे.
 

Web Title: who chief scientist soumya swaminathan said no scientific reason behind night curfew in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.