जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव, चीननंतर या चार मोठ्या देशांमध्ये संकटाची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:53 PM2020-03-12T16:53:37+5:302020-03-12T17:32:58+5:30

चीनमध्ये आतापर्यंत  संक्रमणाच्या 80 हजार 793 प्रकरणांची पुष्टि झाली आहे. तर 3 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे तब्बल 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1 लाख 26 हजार 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

WHO declares coronavirus crisis a pandemic SNA | जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव, चीननंतर या चार मोठ्या देशांमध्ये संकटाची चाहूल

जगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव, चीननंतर या चार मोठ्या देशांमध्ये संकटाची चाहूल

Next
ठळक मुद्देजगभरात तब्बल 1,26,200 जणांना कोरोनाची लागणजगभरात कोरोनामुळे तब्बल 4,632 जणांचा मृत्यूचीन बाहेर आतापर्यंत 1460 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली - चीनमधील वुहान शहरापासून पसरायला सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने (कोविड-19) आतापर्यंत तब्बल 110 हून अधिक देशांना विळखा घातला आहे. हा व्हायरस जगभरात पसरत असतानाच चीनमध्ये मात्र आता कोरोना संक्रमणाचा आकडा घटत असल्याचे दिसत आहे. चीनमधील आरोग्य आयोगाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी चीनमध्ये 15 रुग्ण आढळून आले तर 11 जणांचा मृत्यू झला.

चीन बाहेर आतापर्यंत 4 हजार 632 जणांचा मृत्यू
आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत  संक्रमणाच्या 80 हजार 793 प्रकरणांची पुष्टि झाली आहे. तर 3 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे तब्बल 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1लाख 26 हजार 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील वुहान आणि हुबेई प्रांतातील जवळपास 5 कोटी लोक अद्यापही लॉक डाउन आहे.

या महत्वाच्या देशांना बसला आहे कोरोनाचा फटका - 

भारत
भारतात आतापर्यंत 73 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सरकारने नवीन निर्देशही जारी केले आहेत. सरकारने बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार, 13 मार्चला सायंकाळी 5.30 वाजल्यापासून (12 जीएमटी) पुढील 35 दिवसांसाठी जगातील कोणत्याही देशातील प्रत्येक व्यक्तीचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. केवळ डिप्लोमॅटिक आणि एम्प्लॉयमेंट व्हिसाला यातून सूट देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी परदेशात जावे. तसेच भारतातील सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा वैध राहतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दक्षिण कोरिया -
कोरिया सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने दिलेल्या माहिती नुसार, येथे 24 तासांत नवीन 114 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर पाच जणांचा मृत्यू  झाला आहे. आता पर्यत येथे एकूण 7 हजार 869 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली असून 66 जणांचा मृत्यू झाला तर 333 जण बरे झाले आहेत. द.कोरियात सर्वाधीक फटका डेगू शहराला बसला आहे. येथे तब्बल 5 हजार 867 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

इटली
यूरोपात कोरोना व्हायरसचा  सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. येथे तब्बल 12 हजार 462 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 827 लोकांचे बळी गेले आहेत. इटलीचे पंतप्रधान गिउसेप कोंटे यांनी देशातील सर्व दुकाने, कॉफी बार, पब, रेस्तरा आणि ब्यूटी सलून बंद करण्याची घोषणा केली आहे.  तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांनाही सुटी घेण्याची अपील केली आहे. एवढेच नाही, तर सरकारने संपूर्ण देशात मंगळवारी लॉकडाऊन केले होते. यामुळे देशातील जवळपास 6 कोटी लोक आपापल्या घरांत बंद आहेत.

अमेरिका
न्यूयॉर्क टाइम्सच्या डेटा बेसप्रमाणे, गुरुवारी सकाळपर्यंत देशात 1 हजार 257 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी यूरोपवर पुढील 30 दिवसांसाठी ट्रॅव्हल बॅन लावला आहे. यामुळे यूरोपातील देशांतून कुणालाही एक महिन्यापर्यंत अमेरिकेत जाता येणार नाही. मात्र यातून यूकेला सूट देण्यात आली आहे. 

डब्ल्यूएचओकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित -
जागतील आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी कोरोना व्हारसला महामारी म्हणून घोषित केले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयोसियोस यांनी म्हटले आहे, की ही महामारी एकाच वेळी संपूर्ण जगात पसरली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या महामारीला रोकण्यासाठी आक्रामक कारवाई करावी.

आतापर्यंत जगातील 114 देशांतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 90% लोक केवळ चार देशांतील आहेत. यात चीन आणि कोरियाचा समावेश आहे.

 

Web Title: WHO declares coronavirus crisis a pandemic SNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.