New Parliament : कोणत्या कंपनीने बांधले नवीन संसद भवन, किंमत किती, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 01:27 PM2023-05-25T13:27:28+5:302023-05-25T13:30:53+5:30

संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा टाटा प्रोजेक्टने जिंकली होती. यात त्यांनी लार्सन अँड टुब्रोला मागे टाकले होते.

who designed new parliament of india new sansad bhavan | New Parliament : कोणत्या कंपनीने बांधले नवीन संसद भवन, किंमत किती, जाणून घ्या

New Parliament : कोणत्या कंपनीने बांधले नवीन संसद भवन, किंमत किती, जाणून घ्या

googlenewsNext

देशात नव्या संसदेच्या उद्धाटनावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेचे उद्घाटन करणार आहेत. याबाबतची तयारी जोरात सुरू आहे. त्याचबरोबर विरोधकांचाही नाराजी असल्याने या उद्घाटन सोहळ्याला विरोध होत आहे. या सगळ्या दरम्यान, नवीन संसद भवन कोणी बांधले हे तुम्हाला माहीत आहे का? कंपनीचे नाव काय आहे? डिझाइन करणारा आर्किटेक्ट कोण आहे? चला जाणून घेऊया. 

Photos: ८६२ कोटींमध्ये बनून तयार झालं नवं संसद भवन, जाणून घ्या याचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांच्याबद्दल

नवीन संसद भवन देशातीलच कंपनीने बांधले आहे. ही टाटा प्रोजेक्ट लिमिटेड ही देशातील सुप्रसिद्ध टाटा समूहाची कंपनी आहे. संसद भवनाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती. ही निविदा टाटा प्रोजेक्टनेच जिंकली होती. हा सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनांचा एक भाग आहे. या निविदेसाठी टाटा प्रकल्पाने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत बाजी मारली. टाटा प्रोजेक्ट्सने ८६१.९ कोटी रुपयांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची ऑफर दिली होती. सध्या टाटा प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा आणि एमडी विनायक पै आहेत.

गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाईन्सने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल आहेत. बिमल पटेल यांनी अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केले आहे. स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्यासाठी त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विश्वनाथ धाम काशी विश्वनाथ मंदिर, गुजरात हायकोर्ट बिल्डिंग, आयआयएम अहमदाबाद कॅम्पस, टाटा सीजीपीएल टाउनशिप, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठासह अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केले आहे. 

या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजक्टने ८६२ करोड रुपयांमध्ये केली आहे. या संसदेत ८८८ सदस्य बसू शकतात. तसेच राज्यसभेत ३८४ सदस्य बसू शकतात. नवे संसद भवन रेकॉर्ड वेळेत बनवले आहे. याची पायाभरणी १० डिसेंबर २०२० रोजी झाली. नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत आहे. संपूर्ण कॅम्पस ६४,५०० चौरस मीटर आहे. येथे ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत. सध्याच्या संसद भवन १९२७ साली पूर्ण झाले. त्याला आता जवळपास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

Web Title: who designed new parliament of india new sansad bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.