रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:23 AM2024-01-22T11:23:00+5:302024-01-22T11:23:52+5:30

या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे.

Who gave maximum donation for Ramlal As much as 101 kg of gold was gifted for the ram temple | रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

आज भारताच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. आज अयोध्येत रामलला विराजमान होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे सजले असून प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाले आहे. आज दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणर आहे.

महत्वाचे म्हणजे, या भव्य दिव्य राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्णपणे रामभक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीतून सुरू आहे. राम मंदिरासाठी देश आणि परदेशातील कोट्यवधी भक्तानी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी कुठल्याही सरकारने एक पैसाही दिलेला नाही. हे मंदिरी पूर्ण पणे भक्त मंडळींनी देणगी स्वरुपात दिलेल्या पैशांतून उभे रात आहे. या मंदिरासाठी सर्वा मोठी देणगी सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने दिले आहे.
 
या हीरा व्यापाऱ्याने देणगी देणण्याच्या बाबतीत मोठ-मोठ्या  उद्योगपतिंनाही मागे टाकले आहे. सुरतमधील दिग्गज हीरे व्यापारी दिलीप कुमार व्ही. लाखी यांच्या कुटुंबाने अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं देणगी स्वरुपात दिले आहे. याचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने मढवण्यासाठी केला जाणार आहे.

दिलिप कुमार व्ही. लाखी हे सूरत मधील सर्वात मोठ्या हीरे फॅक्ट्रिंपैकी एक असलेल्या फॅक्ट्रीचे मालक आहेत. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरासाठी लाखी कुटुंबाने ट्रस्टला आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी दिल्याचे सांगितले जात आहे. लाखी कुटुंबाने राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब तसेच मंदिराच्या तळमजल्यावरील 14 सुवर्ण दरवाजांसाठी 101 किलो सोने पाठविले आहे. 

भेट केलं 68 कोटी रुपयांचं सोनं -
सध्या सोन्याचा दर 68 हजार रुपए प्रति 10 ग्रॅम एढा आहे. यानुसार एक किलो सोन्या दर जवळपास 68 लाख रुपए एवढा होतो. यानुसार एकूण 101 किलो सोन्याची किंमत जवळपास 68 कोटी रुपये एवढी होते. अशा प्रकारे लाकी कुटूंबाने राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी दुसऱ्या स्वरुपाची देणगी दिली आहे, ते कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी. त्यांनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये बसलेल्या त्यांच्या रामभक्त अनुयायांनीही वेगवेगळ्या स्वरुपात तब्बल 8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच, राम मंदिर उभारणीसाठी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे डायमंड कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत.
 

Web Title: Who gave maximum donation for Ramlal As much as 101 kg of gold was gifted for the ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.