भगवा घालून पोलिसांना मारहाणीचा परवाना कोणी दिला - अखिलेश
By admin | Published: April 25, 2017 09:09 PM2017-04-25T21:09:12+5:302017-04-25T21:15:51+5:30
भगव्या रंगाचे कपडे घालून पोलिसांना मारहाण करण्याचा परवाना कोणी दिला, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 25 - भगव्या रंगाचे कपडे घालून पोलिसांना मारहाण करण्याचा परवाना कोणी दिला, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला.
अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अलाहाबाद येथे बीएसपी नेत्याच्या हत्येवरून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली. तसेच, भगव्या रंगाचे कपडे परिधान केले म्हणजे पोलीस ठाण्यात घुसण्याची परवानगी मिळते की काय? पोलिसांना मारहाण करण्याचा परवाना कोणी दिला, असा सवाल करत स्वातंत्र्यानंतरही पोलिसांना अशा प्रकारची वागणूक दिली गेली नव्हती ती आता दिली जात आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.
याचबरोबर समाजवादी पक्षाची सत्ता असताना काही योजना राबविण्यात आल्या होत्या. त्या योगी आदित्यनाथ सरकारकडून बंद करण्यात येत आहेत. अनेक प्रकल्पांची आणि योजनांची पाहणी करण्यात येत असून स्मार्ट फोन योजना सुद्धा बंद करण्यात आली आहे. तसेच, ज्या महिलांची पेन्शन सध्याच्या सरकारने बंद केली आहे, त्यांना आमच्यासोबत घेऊ, असेही अखिलेश यादव म्हणाले.