2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम काेणाच्या नावे?; हे आहेत १० उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:03 AM2024-04-12T06:03:27+5:302024-04-12T06:04:54+5:30
भाजपच्या नऊ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
मुंबई : २०१९मधील लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार विक्रमी मतांधिक्क्यामुळे चर्चेत आले होते. त्यापैकी गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सी. आर. पाटील हे सर्वाधिक म्हणजे ६ लाख ८९ हजार एवढ्या विक्रमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते. विक्रमी मतांनी विजयी झालेल्या दहा उमेदवारांमध्ये भाजपच्या नऊ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
विजयातील अंतर किती?
नवसारी (गुजरात) - सी. आर. पाटील (भाजप) ६.८९
भिवलाडा (राजस्थान) - सुभाष बहेरिया (भाजप) ६.१२
गांधीनगर (गुजरात) - अमित शाह (भाजप) ५.५७
वाराणसी (उत्तर प्रदेश) - नरेंद्र मोदी (भाजप) ४.७९
सुरत (गुजरात) - दर्शना जारदोष (भाजप) ५.४८
वडोदरा (गुजरात) - राजनाथ भट्ट (भाजप) ५.८९
प. दिल्ली - परवेश वर्मा (भाजप) ५.७८
वा. दिल्ली - हंसराज हंस (भाजप) ५.५३
कांगरा (हिमाचल प्रदेश) - किशन कपूर (भाजप) ४.७७
वायनाड (केरळ) - राहुल गांधी (काँग्रेस) ४.३१