जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:54 AM2021-06-29T09:54:39+5:302021-06-29T09:56:53+5:30

लष्करानं कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

Who is Indian Army officer Dr Deepshikha Chettri and why people are talking about her | जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या समावेशाबाबतच्या खूप चांगल्या बातम्या समोर येत आहेत. भारतीय लष्करात आता महिला अधिकाऱ्यांचीही स्थायी स्वरुपात नियुक्ती केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी भारतीय लष्करानं जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांना तैनात करुन इतिहास रचला होता. आता भारतीय सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लष्करानं कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे. 

कॅप्टन दीपशिखा छेत्री मूळच्या सिक्कीम येथील रहिवासी असून त्या राज्याच्या दुसऱ्या महिला लष्करी अधिकारी आहेत. विशेष म्हणजे डॉ. दीपशिखा यांना लष्कराच्या वैद्यकीय परीक्षेत देशात सहावा क्रमांक मिळाला होता. तर सैन्याच्या वैद्यकीय परीक्षेत समाविष्ट असलेल्या महिला उमेदवारांमध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. सैन्यात डॉक्टरकीची सेवा देत सीमेवर दहशतवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी सज्ज असणाऱ्या दीपशिखा यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांसाठी व संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. काही दिवसांपूर्वी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपशिखा यांचं कौतुक केलं होतं. 

लष्करी वैद्यकीय परीक्षेत टॉपर
कॅप्टन दीपशिखा यांचे वडील राजेंद्र छेत्री आणि आई बिंदु छेत्री यांना आपल्या मुलीच्या कामगिरीवर खूप अभिमान आहे. कॅप्टन दीपशिखा यांनी सिक्कीमच्या मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. कॅप्टन दीपशिखा आता पुढील आठ महिने फ्रंटलाइनवर ड्युटी करणार आहे. सैन्यात डॉक्टरकीची सेवा देत सीमेवर हातात बंदुक घेत सेवा देणाऱ्या दीपशिखा देशातील युवापिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. 

राजौरीच्या फ्लाइंग ऑफिसर देखील चर्चेत
कॅप्टन दीपशिखा छेत्री यांच्यासह जम्मू-काश्मीरच्या फ्लाइंग ऑफिसर माव्या सूदान यांनीही इतिहास रचला आहे. प्लाइंग ऑफिसर सूदान यांची भारतीय हवाई दलात फायटर पायलटपदावर नियुक्ती झाली आहे. त्या जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत. फ्लाइंग ऑफिसर सूदान राजौरी यांनी नौशेराच्या एका छोट्या गावातील रहिवासी आहे. माव्या सूदान या हवाई दलातील १२ व्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत. 

सीमा रेषेवर महिलांची नियुक्ती
भारतीय लष्करानं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून दहशतवादी विरोधी मोहिमेत महिला सैनिकांचा समावेश करण्यास सुरुवात केली. देशात पहिल्यांदाच सीमारेषेवर महिला सैनिकांना तैनात करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अँटी-नार्कोटिक्स ग्रिडला महिलांच्या नियुक्तीनं आणखी मजबूत करण्याचा लष्काराचा इरादा आहे. या महिला सैनिकांवर नार्कोटिक्ससोबतच आयईडीचा शोध लावण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Who is Indian Army officer Dr Deepshikha Chettri and why people are talking about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.