कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:08 AM2024-09-17T09:08:08+5:302024-09-17T09:12:16+5:30
चार महिन्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांच्या छोट्या मुलाचा साखरपुडा पार पडला होता आणि आता मोठा मुलगा कार्तिकेय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठा मुलगा कार्तिकेय सिंह चौहान याचं लग्न ठरलं आहे. १७ ऑक्टोबरला कार्तिकेयचा साखरपुडा राजस्थान उदयपूर येथील अमानत बन्सलसोबत होणार आहे. स्वत: शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. एक वडील म्हणून आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे असं त्यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे.
शिवराज सिंह चौहान पोस्टमध्ये म्हणतात की, माझी धर्मपत्नी साधना आणि पूर्ण कुटुंब आज आनंदाने तुम्हाला कळवत आहोत की, माझा मोठा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा अनुपम बन्सल आणि रुचिता बन्सल यांची कन्या अमानत बन्सल हिच्याशी ठरला आहे. १७ ऑक्टोबरला कार्तिकेय आणि अमानत यांचा साखरपुडा संपन्न होईल. मुलांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात असं त्यांनी सांगितले.
एक पिता के रूप में आज मेरे लिए बहुत खुशी का अवसर है। मैं, मेरी धर्मपत्नी साधना और पूरे परिवार को आप सभी से यह शुभ समाचार साझा करते हुए अत्यंत प्रसन्नता हो रही है कि मेरे बड़े बेटे कार्तिकेय की सगाई श्री अनुपम बंसल जी और श्रीमती रुचिता बंसल जी की सुपुत्री अमानत बंसल से तय हुई है।…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) September 16, 2024
कोण आहे अमानत?
राजस्थानच्या उदयपूर येथे राहणारी अमानत बन्सल ही प्रसिद्ध शूज कंपनी लिबर्टीची कार्यकारी संचालिका आहे. तिची आई रुचिता बन्सल या कन्फेडरेशन ऑफ विमन इंटरप्रेन्योर्स ऑफ इंडिया हरियाणाच्या फाऊंडर आहेत. अमानतनं अलीकडेच लंडनमधील ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून साइकोलॉजीमधून एमएससीचं शिक्षण पूर्ण केले.
कार्तिकेय राजकारणात सक्रीय
शिवराज सिंह चौहान यांच्या कुटुंबात पत्नी साधना सिंह आणि २ मुले आहेत. मोठ्या मुलाचं नाव कार्तिकेय आणि छोट्या मुलाचं नाव कुणाल आहे. कुणाल राजकारणापासून दूर राहत विदिशात मेसर्स सुंदर फुड्स अँन्ड डेअरीचं कामकाज पाहतो. मोठा मुलगा कार्तिकेय हा वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रीय आहे. शिवराज सिंह चौहान यांचा राजकीय वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. २०१३ साली वडिलांच्या प्रचारात कार्तिकेयने सहभाग घेतला होता.
४ महिन्यापूर्वी लहान मुलाचा साखरपुडा
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा छोटा मुलगा कुणाल सिंह चौहान याचा ४ महिन्यापूर्वी साखरपुडा संपन्न झाला. कुणालचं लग्न भोपाळ येथील डॉक्टर इंद्रमल जैन यांची नात रिद्धी जैन हिच्याशी ठरलं आहे.