मिठाईवाला ते यशस्वी उद्योजक! कोण आहे अशोक मित्तल?; AAP कडून राज्यसभेची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:13 PM2022-03-21T13:13:14+5:302022-03-21T13:13:49+5:30

लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी सध्या देशातील सर्वात मोठी खासगी यूनिवर्सिटीपैकी एक आहे. ६०० एकरमध्ये पसरलेल्या या विद्यापीठाचे जगातील ५० हून अधिक देशांत विद्यार्थी आहेत.

Who is Ashok Mittal ?; Opportunity for Rajya Sabha from Punjab by AAP quota | मिठाईवाला ते यशस्वी उद्योजक! कोण आहे अशोक मित्तल?; AAP कडून राज्यसभेची संधी

मिठाईवाला ते यशस्वी उद्योजक! कोण आहे अशोक मित्तल?; AAP कडून राज्यसभेची संधी

Next

नवी दिल्ली – पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं काँग्रेसची दाणादण केली. ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागा जिंकलेली आप आता पंजाबमधून राज्यसभेच्या जागांसाठी काही नावं पाठवली आहेत. यात ५ जणांचे नाव आले आहे. यातील एक नाव म्हणजे अशोक मित्तल. पंजाबमधील आपच्या कोट्यातून अशोक मित्तल यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. अशोक मित्तल लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटीचे चांसलर आहेत.

लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी सध्या देशातील सर्वात मोठी खासगी यूनिवर्सिटीपैकी एक आहे. ६०० एकरमध्ये पसरलेल्या या विद्यापीठाचे जगातील ५० हून अधिक देशांत विद्यार्थी आहेत. २००१ मध्ये अशोक मित्तल यांनी या यूनिवर्सिटीची स्थापना केली होती. अवघ्या कमी काळात त्यांनी देशातील नामांकित विद्यापीठात त्यांनी लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटीचं नावलौकीक केले. अशोक मित्तल यांचे वडील बलदेव राज मित्तल यांचे मिठाईचं दुकान होते. त्यासाठी त्यांनी ५०० रुपये कर्ज काढलं होतं. मिठाईची किंमत कमी असल्याने दुकानात चांगली कमाई होऊ लागली.

वडिलांच्या कामात हातभार लावण्यासाठी मोठा मुलगा रमेश आणि नरेश दोघांना अर्धवट शिक्षण घ्यावं लागलं. रमेशनं ११ वीनंतर शिक्षण सोडलं तर नरेशनं कॉलेजचं शिक्षण अर्धवट ठेवले. लहान मुलगा अशोकनं शिक्षण पूर्ण करत लॉमध्ये पदवी घेतली. १९८६ मध्ये मित्तल कुटुंबाने मिठाईचा व्यवसाय वाढवला आणि जालंधर येथे लवली स्वीट्स नावाने मिठाईचं शोरुम उघडलं. ज्याठिकाणी विविध प्रकारच्या मिठाई विक्री होत होती. शिक्षण झाल्यानंतर अशोक मित्तल यांनी व्यवसायात प्रवेश केला. परंतु त्यांचा व्यवसाय मिठाईपर्यंत मर्यादित न राहता तो दुसऱ्या क्षेत्रातही वाढला. ते ऑटो सेक्टरमध्ये शिरले.

९० च्या दशकात बजाज टू व्हीलर सामान्यांची ओळख झाली. तेव्हा बजाजची डीलरशीप घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सुरुवातीला बजाजनं डीलरशीप एका मिठाईवाल्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर कठीण आव्हानानं त्यांना डीलरशीप मिळाली. १९९१ मध्ये लवली ऑटो नावानं त्यांनी डीलरशीप सुरू केली. त्यानंतर अशोक मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. २००१ मध्ये पंजाबमध्ये फगवाडा येथे पहिलं कॉलेज सुरू केले. याठिकाणी ३.५ एकर जागा होती. हळूहळू सर्व कॉलेजचा समावेश झाला. त्यानंतर लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी बनवली. २००५ मध्ये पंजाब सरकारने या विद्यापीठाला मान्यता दिली. आज अशोक मित्तल वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत असताना आता त्यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेत खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Who is Ashok Mittal ?; Opportunity for Rajya Sabha from Punjab by AAP quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.