सुषमा स्वराज यांची मुलगी बन्सुरी स्वराज यांना लोकसभेचं तिकीट, आतापर्यंतची कारकीर्द काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:41 AM2024-03-03T00:41:51+5:302024-03-03T00:43:37+5:30
जाणून घेऊया कोण आहेत बन्सुरी स्वराज आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास...
भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने दिल्लीतील पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी भाजपने नवी दिल्लीतून दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना तिकीट दिले आहे. जाणून घेऊया कोण आहेत बन्सुरी स्वराज आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास...
बन्सुरी स्वराज यांचे शिक्षण कुठे झाले?
नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपने ज्या उमेदवारावर विश्वास व्यक्त केला आहे त्या म्हणजे माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी आहे. बन्सुरी स्वराज यांचा जन्म १९८२मध्ये दिल्लीत झाला. त्यांनी इंग्लंडच्या वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. याशिवाय बन्सुरी यांनी कायद्याचे (law) शिक्षण घेतले आहे. त्यांनी लंडनच्या बीपीपी लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली.
सर्वोच्च न्यायालयात वकिलीचा सराव
भाजपचे नवी दिल्लीतील उमेदवार बन्सुरी स्वराज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या सर्वोच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत आहेत.
आतापर्यंतची कारकीर्द
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बन्सुरी दिल्लीत आल्या आणि २००७ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये सामील झाल्या. बन्सुरी स्वराज या १६ वर्षांहून अधिक काळ विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी रिअल इस्टेट, करार आणि कर इत्यादींशी संबंधित अनेक गुन्हेगारी प्रकरणे हाताळली आहेत.
ट्विटरवर सक्रिय असतात
बन्सुरी स्वराज या X (पूर्वीचे Twitter) वर खूप सक्रिय आहेत आणि राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर तसेच महिला सशक्तीकरणावर त्यांची मते शेअर करतात.
भाजपमधील कारकीर्द
गेल्या वर्षी, त्या दिल्ली राज्याच्या कायदा सेलच्या राज्य समन्वयक बनल्या. गेल्या वर्षी २६ मार्च रोजी बन्सुरी स्वराज यांना भाजपने दिल्ली राज्याच्या कायदा कक्षाचे राज्य सहसंयोजक बनवले होते. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी आली आहे. नवी दिल्ली सीट ही दिल्लीच्या खास जागांपैकी एक आहे. सध्या मीनाक्षी लेखी या जागेवर खासदार आहेत. पण यावेळी त्यांचे तिकीट कापून या जागी भाजपने बन्सुरी स्वराज यांना तिकीट दिले आहे.