कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:37 AM2022-03-11T11:37:04+5:302022-03-11T11:37:41+5:30

Pallavi Patel : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला.

who is pallavi patel defeated keshav prasad maurya in wave of bjp uttar pradesh election 2022 result | कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला

कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला

googlenewsNext

लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना सिरथू विधानसभेच्या जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला.

सपा उमेदवार पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली. पल्लवी पटेल या समाजवादी पार्टीचा सहयोगी पक्ष अपना दलच्या (कमेरावादी) राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. सुरुवातीपासूनच पल्लवी पटेल यांनी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी घेतली आणि शेवटी विजय मिळवला. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयाच्यावेळी केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते.

पराभवानंतर केशव प्रसाद मौर्य म्हणाले...
निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मी जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारतो. केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट केले की, "सिराथू विधानसभा मतदारसंघातील जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीबद्दल मी कृतज्ञ आहे, ज्या मतदारांनी मतांच्या रूपात आशीर्वाद दिला त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो."

कोण आहेत पल्लवी पटेल?
पल्लवी पटेल या अपना दल (सोनेलाल) पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांच्या बहीण आहेत. पल्लवी पटेल आणि अनुप्रिया पटेल यांचे वडील सोनेलाल पटेल यांनी अपना दल स्थापन केला होता. त्यानंतर 2009 मध्ये सोनेलाल पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा पटेल यांनी पक्षाची धुरा सांभाळली. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाने भाजपसोबत युती केली आणि अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून खासदार झाल्या. मात्र, नंतर त्यांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यानंतर अनुप्रिया पटेल आणि त्यांचे पती आशिष सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये अनुप्रिया पटेल यांनी आपला दल (सोनेलाल) स्थापन केला. तर अपना दलची (कमेरावादी)  कमान पल्लवी पटेल आणि त्यांची आई कृष्णा पटेल यांच्याकडे आहे.

Web Title: who is pallavi patel defeated keshav prasad maurya in wave of bjp uttar pradesh election 2022 result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.