Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:54 PM2022-04-30T17:54:39+5:302022-04-30T17:55:11+5:30
Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे.
नवी दिल्ली - पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार राज्यामधील शांतता आणि सद्भावनेची परिस्थिती बिघडू देणार नाही. राज्यातील लोक शांतता आणि धार्मिक सद्भावनेवर विश्वास ठेवणारे आहेत. तसेच सरकार कुठल्याही परिस्थिती तो कायम ठेवेल.
मान यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थानिकांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी विश्वास-निर्माणासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सांगितले की, कालच्या तणावामुळे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे काही सदस्य होते, काही भाजपाचे सदस्य होते, त्यांचे जिल्हाध्यक्ष होते. तर दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते होते. हा दोन राजकीय पक्षांमधील संघर्ष होता. तो सांप्रदायिक तणाव नव्हता, असे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.
मान यांनी पुढे सांगितले की, पंजाबचे लोक शांतता आणि सद्भावनेमध्ये विश्वास ठेवतात. आम्ही पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण होऊ देणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू देणार नाही. पंजाब हे सरहद्दीवरील राज्य आहे. तसेच पतियाळामधील परिस्थिती आहा सामान्य आहे.
दरम्यान, आज सकाळी मान यांनी हिंसाचारप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये पोलीस महासंचालक (पतियाळा रेंज), पतियाळाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्त्य़ांनी सांगितले की, मुखविंदर सिंह चिन्ना यांची पतियाळा रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.