सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री काेण? ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ कोट्यधीश, ‘एडीआर’चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 08:24 AM2023-04-13T08:24:44+5:302023-04-13T08:27:50+5:30
३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे
नवी दिल्ली :
३० विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे, असा निष्कर्ष लोकशाही सुधारणावादी संघटनेने (निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या विश्लेषणानंतर काढला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे जवळपास १५ लाख रुपयांची सर्वात कमी संपत्ती आहे, असे एडीआरने म्हटले आहे.
₹५१० कोटी + जगन मोहन रेड्डी, आंध्र प्रदेश
₹१६३ कोटी + पेमा खांडू, अरुणाचल प्रदेश
₹६३ कोटी + नवीन पटनायक ओडिशा
एडीआर आणि इलेक्शन वॉच (न्यू) सांगितले की...
>> राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या स्व-शपथ मतदान प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत.
>> ९७% मुख्यमंत्री कोट्यधीश.
>> ३३.९६ कोटी रुपये प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता
>> बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल या दोघांकडे ३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे अहवालात म्हटले आहे
कमी संपत्ती असलेले
ममता बॅनर्जी, प. बंगाल , १५ लाखांपेक्षा जास्त
पिनाराई विजयन, केरळ , १ कोटींहून अधिक
मनोहर लाल खट्टर, हरयाणा १ कोटींहून अधिक
१३ जणांवर गंभीर गुन्हे
३० मुख्यमंत्र्यांपैकी १३ (४३%) वर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व गुन्हेगारी धमकीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हेगारी प्रकरणे हे अजामीनपात्र गुन्हे आहेत, ज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कारावास आहे, असे अहवालात म्हटले.
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती?
आंध्र प्रदेश- ₹५१०.३८ कोटी
अरुणाचल- ₹१६३.५० कोटी
ओडिशा- ₹६३.८७ कोटी
नागालॅंड- ₹४६.९५ कोटी
पद्दुचेरी- ₹३८.३९ कोटी
तेलगंणा- ₹२३.५५ कोटी
छत्तीसगड- ₹२३.०५ कोटी
आसाम- ₹१७.२७ कोटी
मेघालय- ₹१४.०६ कोटी
त्रिपुरा- ₹१३.९० कोटी
महाराष्ट्र- ₹११.५६ कोटी
गाेवा- ₹९.३७ कोटी
कर्नाटक- ₹८.९२ कोटी
तामीळनाडू- ₹८.८८ कोटी
झारखंड- ₹८.५१ कोटी
गुजरात- ₹८.२२ कोटी
हिमाचल- ₹७.८१ कोटी
मध्य प्रदेश- ₹७.६६ कोटी
राजस्थान- ₹६.५३ कोटी
उत्तराखंड- ₹४.६४ कोटी
सिक्कीम- ₹३.८९ कोटी
मिझाेरम - ₹३.८४ कोटी
दिल्ली- ₹३.४४ कोटी
बिहार- ₹३.०९ कोटी
पंजाब- ₹१.९७ कोटी
उत्तर प्रदेश- ₹१.५४ कोटी
मनिपूर- ₹१.४७ कोटी
हरयाणा- ₹१.२७ कोटी
केरळ- ₹१.१८ कोटी
पचिम बंगाल- १५ लाख