आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:20 PM2024-09-21T22:20:22+5:302024-09-21T22:21:06+5:30
यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केजरीवाल यांच्यासमोर एक वरिष्ठ आयएएस अधिकारी हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. कोण आहेत ते अधिकारी...?
आम आदमी पक्षाच्या नेते आतिशी यांनी आज राजभवनात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर पाच नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एलजी विनय सक्सेना यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्यात पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह पक्षाचे सर्व वडे नेते उपस्थित होते. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केजरीवाल यांच्यासमोर एक वरिष्ठ आयएएस अधिकारी हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. कोण आहेत ते अधिकारी...?
हात जोडून उभे होते मुख्य सचिव धर्मेंद्र -
खरे तर केजरीवाल यांच्यासमोर हात जोडून उभे असलेले हे अधिकारी स्वतः राज्याचे नवे मुख्य सचिव धर्मेंद्र हे आहेत. AGMUT कॅडरचे 1989 बॅचचे अधिकारी धर्मेंद्र यांनी 1 सप्टेंबरला दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळला आहे. शनिवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याचे संचालन आणि व्यवस्था त्यांच्याच देखरेखीखाली पार पडली.
#WATCH | Delhi Chief Secretary Dharmendra greets AAP National Convenor & Former CM Arvind Kejriwal at Raj Niwas pic.twitter.com/KJ6lvTWvCC
— ANI (@ANI) September 21, 2024
समारंभानंतर ते खाली उतरून तेथे बसलेल्या लोकांना अभिवादन करत होते. याच वेळी अरविंद केजरीवाल यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी त्यांचेही अभिवादन केले. यावेळी केजरीवाल यांनीही हसत-हसत त्यांच्या अभिवादनाचा स्वीक केला. यावेली त्यांच्यात काच बोलणे जाले, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेले नाही. मात्र जोवर दोघे बोलत होते, तोवर मुख्य सचिव हात जोडून अभिवादनाच्या मुद्रेत उभे होते.