Video: संसद सभागृहात उड्या मारणारे कोण?; निलमने सांगितलं हा 'आवाज कुणाचा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:00 PM2023-12-13T16:00:35+5:302023-12-13T16:02:25+5:30
देशाच्या संसदेत आज धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेच्या खासदारांच्या बसण्याच्या जागेपासून अवघ्या १०-१२ फुट उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली होती.
देशाच्या संसदेतील लोकसभा प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी सभागृहात उड्या घेतल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. काही क्षणातच ही घटना देशभर पसरली. विशेष म्हणजे संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे, नेमकं आजच संसदेत अशाप्रकारे घुसकोरी झाल्याने घुसकोरी करणारे नेमके कोण, त्यांचा यामागील उद्देश काय होता, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संसदेत घुसकोरी करणाऱ्यांची साथीदार युवतीही संसदेच्या परिसरात घोषणाबाजी करत होती. या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावेळी आपण कोण आहोत, ते तिने सांगितले.
देशाच्या संसदेत आज धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेच्या खासदारांच्या बसण्याच्या जागेपासून अवघ्या १०-१२ फुट उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली होती. तसेच या तरुणांनी सभागृहात पिवळे स्मोक कँडलही फोडले होते. जेव्हा पहिल्या तरुणाने उडी मारली ती बसपाचे खासदार मलूक नागर यांच्या बरोबर पाठीमागे मारली. काही खासदारांनी पुढाकार घेऊन या दोघांना पकडले, यावेळी सुरक्षा रक्षकही सभागृहात धावले होते. अखेर, हे घुसकोरी करणारे कोण आहेत, त्यांचा उद्देश काय होता, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक खासदारांनी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नही चलेगी नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केला. यामध्ये २ युवक आणि १ युवतीचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनीही तिघांनाही अटक केली आहे. या अटक केलेल्यांमध्ये एक युवक अमोल शिंदे महाराष्ट्राच्या लातूरमधील असल्याचे समजते. तर, निलम सिंह ही तरुणी मूळ हरयाणाच्या जींद जिल्ह्यातील आहे. निलमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून नही चलेगी.. नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी.. असे म्हणत निलमने आपण विद्यार्थी असल्याची माहिती दिली. निलमचा व्हिडिओ समाजमाध्यमातून समोर आला आहे.
माझं नाव निलम आहे, भारत सरकारकडून आमच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा हा विरोध आहे. आम्ही आमच्या हक्क मागतो, त्यावेळी, लाठीचार्ज करुन आम्हाला तुरुंगात टाकलं जातं. आम्हाला टॉर्चर केलं जातं. त्यामुळे, आमच्याकडे कुठलंही दुसरं माध्यम नाही. आम्ही कुठल्याही संघटनेशी संबधित नसून आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही बेरोजगार आहोत, आमचे आई-वडिल एवढं काम करतात, ते मजूर आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, पण सरकार कुणाचाच आवाज ऐकत नाही. सरकारची ही हुकूमशाही चालणार नाही, असे म्हणत निलमने त्यांचा संसदेतील कृत्याचा उद्देश आणि स्वत:बद्दल माहिती दिली.
मेरा नाम नीलम है.. भारत सरकार जो हम पर अत्याचार कर रही है लाठी डंडे चल रही है। अंदर डाला जा रहा है। टॉर्चर किया जा रहा है। हमारे पास और कोई मध्यम नहीं बचा। हम स्टूडेंट है। हमारा किसी संगठन से संबंध नहीं है। तानशाही बंद करो...
— Ajay Jha (@Ajay_reporter) December 13, 2023
(प्रदर्शनकारी नीलम...) pic.twitter.com/IDBWdQF03W
दरम्यान, निलमने स्वत:ची माहिती देताना, पोलिसांसोबत चालत असताना सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. हुकूमशाही बंद करा.. तानाशाही नही चलेगी.. भारत माती की जय.. अशी घोषणाबाजी केली. महिला पोलिसांनी निलमला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.