तर काळविटाला कोणी मारलं? सलमानच्या सुटकेवर ट्विटरवर संताप
By Admin | Published: January 18, 2017 06:00 PM2017-01-18T18:00:04+5:302017-01-18T18:12:01+5:30
अभिनेता सलमान खानची जोधपूर कोर्टाने काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - अभिनेता सलमान खानची जोधपूर कोर्टाने काळविट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली. 18 वर्षांनंतर हा निकाल आला. जोधपूर न्यायालयात बुधवारी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुनावणी झाली. या प्रकरणातून सुटका होणे सलमानसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जर सलमान खान निर्दोश आहे तर त्या काळविटाला कोणी मारलं? असे प्रश्न सोशल मीडियावरून विचारण्यात येत आहेत. एक नजर सोशल मीडियावरील काही प्रतिक्रियांवर-
सलमानची निर्दोश मुक्तता झाली, गोळीसमोर काळविट आल्याने काळवीट दोषी! असं ट्वीट चार लोग (@WoCharLog) या अकाउंटवरून करण्यात आलं आहे.
#JodhpurCourt acquits #SalmanKhan after finding black buck guilty of coming in front of bullet.
— चार लोग (@WoCharLog) 18 January 2017
या जगात काहीही होऊ शकतं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतात, तर काळविट स्वतःवर गोळी चालवून आत्महत्या करतो असं ट्वीट साबाह काझी (@sabakazi) या अकाउंटवरून करण्यात आलं आहे.
Anything can happen in this world. Donald Trump can be become a President and Black Bucks can shoot themselves. #SalmanKhan #SalmanWalksFree
— Sabah Kazi (@sabakazi) 18 January 2017
सर रविंद्र जडेजा (@SirJadeja) या अकाउंटवरून लिहिलं आहे, काळविटाने सलमान खानला बंदुकीच्या सहाय्याने धमकावलं, त्याची कार पळवली आणि रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडलं त्यानंतर अपराधीपणाच्या भावनेतून आत्महत्या केली.
So #Blackbuck Threatened #SalmanKhan At Gunpoint, Took Away His Car, Drove Over People On Footpath, And Then Committed Suicide Due To Guilt. pic.twitter.com/OetlDZX8H1
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) 18 January 2017
कुनाल (@KhiladiKunal) या अकाउंटवरून लिहिलं आहे, '' मोदींनी सलमान खानला म्हटलं- तुम मेरे लिए वोट मांगों मैं तुम्हें आज़ादी दूंगा.
Modi to Salman -- Tum mere liye vote mango mai tumhe Aazadi dunga.
Arms Act #SalmanKhan
— MR.K (@KhiladiKunal) 18 January 2017
आम्ही अशा देशात राहतो जिथे तुम्ही सुपरस्टार असाल तर काहीही करू शकतात असं ट्वीट आशीष मटकरी या अकाउंटवरून करण्यात आलंय.
We live in a country where you can do anything legal or illegal if you are celebrity...#shame#सलमान खान बरी#JodhpurCourt#SalmanKhan
— Ashish Mitkari (@AshishMitkari) 18 January 2017
सलमान खानची निर्दोश मुक्तता व्हावी हा बिग बॉसचा आदेश आहे असं ट्वीट कॉर्पोरेट आत्मा(@aj_mindspark) या अकाउंटवरून करण्यात आलं आहे.
Bigg boss chahte hai ki #SalmanKhan ko Arms act case mein acquit kiya jaaye!
Court: Yes #BigBoss
— CorporateAatma (@aj_mindspark) 18 January 2017