Lockdown Extension : योग्य वेळी कठीन निर्णय, डब्ल्यूएचओकडून भारताची प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:02 PM2020-04-14T17:02:23+5:302020-04-14T17:03:47+5:30

मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. भारताने केलेली ही घोषणा म्हणजे योग्यवेळी घेतेला कठीन निर्णय असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

who lauds prim minister modi decision of extension lockdown till 3rd may sna | Lockdown Extension : योग्य वेळी कठीन निर्णय, डब्ल्यूएचओकडून भारताची प्रशंसा

Lockdown Extension : योग्य वेळी कठीन निर्णय, डब्ल्यूएचओकडून भारताची प्रशंसा

Next

 who lauds prim minister modi decision of extension lockdown till 3rd may
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगलवारी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. भारताने केलेली ही घोषणा म्हणजे योग्यवेळी घेतेला कठीन निर्णय असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओच्या आग्नेय आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या, अनेक प्रकारची आव्हाने असतानाही भारत खंबीरपणे कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनासारख्या या संकटाच्या काळात सर्व भार अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आहे. खरे तर ही वेळ कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रत्येकाने आपेल पूर्णपणे योगदान करण्याची आहे.

नव्या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये -
नव्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात बुधवारी सविस्तर दिशा निर्देश दिले जातील. मी सर्व देशातील जनतेला प्रार्थना करतो, की आता या कोरोनाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नव्या भागात जाऊ द्यायचे नाही. आता स्थानिक पातळीवर एक जरी व्यक्ती कोरोना बाधित आढळला, तर ही देशासाठी चिंतेची बाब ठरेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आपली तुलना कोणत्याही देशाशी करणं योग्य ठरणार नाही, पण... -
 योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचं मोदी म्हणाले. आपली तुलना कोणत्याही देशाशी करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही, असे मोदी म्हणाले.

मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही. अतिशय कमी संसाधनं असताना आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं.
 

Web Title: who lauds prim minister modi decision of extension lockdown till 3rd may sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.