कुणी रचला कानपुरात कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट? आयएसच्या खोरासान मॉड्यूलवर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:48 PM2024-09-09T23:48:47+5:302024-09-09T23:50:00+5:30
...यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे.
कालिंदी एक्सप्रेस डिरेल करण्याचा कट दहशतवादी सघटना आयएसच्या खुरासान माड्यूलने रचा असल्याचा संशल तपास यंत्रनांना आहे. यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे. मात्र अद्याप या संस्थांना कुठल्याही प्रकारचा महतत्वाचा सुगावा लागलेला नाही. पण, हा रेल्वेवर लोन वुल्फ अॅटॅक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
मिळाला होता अलर्ट -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना या संदर्भात नुकताच अलर्ट देखील मिळाला होता, यात देशातील महत्त्वाच्या आस्थापनांन आणि रेल्वेला लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. गेल्या महिनाभरात कानपूरमध्ये रेल्वे डिरेल करण्याचा कट उघडकीस आल्यानंतर, खोरासान मॉड्यूल संशयाच्या भोवऱ्यात आहे. या मॉड्यूलने 2017 मध्ये भोपाळ रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब ठेवला होता, त्याच्या स्फोटनंतर, अनेक प्रवासी जखमी झाले होते.
यानंतर तेलंगणा एटीएसच्या गुप्त माहितीवरून यूपी एटीएसने मॉड्यूल सदस्य सैफुल्ला याला लखनऊमध्ये चकमकीत ठार केले. त्याच्याकडे सिलिंडर बॉम्ब आणि आयईडी आदी साहित्य मिळाले होते. 2017 मध्ये भोपाळ-इंदूर एक्स्प्रेसलाही कानपूरातील पुखराया येथे अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते. त्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
त्यात आयईडीच्या वापराचे संकेत मिळाले होते. त्याचे दुवे बिहारमधील मोतिहारी येथे झालेल्या रेल्वे अपघातातील आरोपींशी जोडले गेले होते. तसेच दुबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या नेपाळच्या शमशुल हुदाचे नाव समोर आले होते. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होता.