न्यायमूर्ती शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण? कायदा मंत्र्यांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:45 PM2021-03-20T13:45:03+5:302021-03-20T13:50:31+5:30

Sharad Bobade Retirement soon: न्या. रंजन गोगोई यांनी सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता केली होती. गोगोई यांनीच आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

Who is the next Chief Justice of the Supreme Court after Sharad Bobade? Letter from the Law Minister | न्यायमूर्ती शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण? कायदा मंत्र्यांचे पत्र

न्यायमूर्ती शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण? कायदा मंत्र्यांचे पत्र

Next

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र शरद अरविंद बोबडे (CJI Sharad Bobade) यांनी 18 नोव्हेंबर 2019 ला सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता. आता येत्या 23 एप्रिलला न्यायमूर्ती शरद बोबडे निवृत्त होत आहेत. (CJI Sharad Bobade will retire on 23 April 2021.  )


न्या. बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court CJI) सीजेआयपदी कोण अशी चर्चा आता होऊ लागली आहे.  न्या. बोबडे निवृत्त होण्यास आता महिनाच राहिला आहे. यामुळे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बोबडेंनाच पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोबडे यांना रविशंकर प्रसाद यांनी लिहिलेल्या पत्रात पुढले सरन्यायाधीश कोण असा प्रश्न केला आहे. 48 वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे कोणाची नियुक्ती करणार आहेत, अशी विचारणा केली आहे. 


सध्या न्यायमूर्ती एन व्ही रमणा (N V Ramana) हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. आतापर्यंतच्या परंपरेनुसार रमणाचे देशाचे पुढील सीजेआय म्हणजेच न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी असतील. परंपरेनुसार निवृत्त होणारे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील नव्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस एक महिना आधी राष्ट्रपतींना पत्र पाठवून करतात. 


सीजेआयकडून हे गोपनिय पत्र राष्ट्रपतींना मिळताच सरकार सर्व औपचारिकता पूर्ण करून ज्येष्ठ असलेल्या जजना मुख्य न्यायाधीश पदी नियुक्त करते. राष्ट्रपती यानंतर त्यांना शपथ देतात. इतिहासात एक-दोन वेळाच असे घडले की, सरकारने ज्येष्ठता क्रमाचे उल्लंघन करत कनिष्ठ जजना सर न्यायाधीश बनविले आहे. यावेळी खूप वादंगही झाले होते. राष्ट्रपतींना पत्र लिहून उत्तराधिकारी निवडण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे. 


शरद बोबडेंची नियुक्ती कोणी केलेली?
न्या. रंजन गोगोई यांनी सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता केली होती. गोगोई यांनीच आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

Web Title: Who is the next Chief Justice of the Supreme Court after Sharad Bobade? Letter from the Law Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.