जाणून घ्या राष्ट्रपतीनियुक्त नव्या खासदारांचं कर्तृत्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:00 PM2018-07-14T13:00:22+5:302018-07-14T13:05:08+5:30

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्याला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हणतात.

Who is the President appointed by the President, Sinha, Mansingh, Shakal, Mahapatra? | जाणून घ्या राष्ट्रपतीनियुक्त नव्या खासदारांचं कर्तृत्व!

जाणून घ्या राष्ट्रपतीनियुक्त नव्या खासदारांचं कर्तृत्व!

Next

नवी दिल्ली- राष्ट्रपतींनी विविध क्षेत्रांमधील चार व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून आज नियुक्त केले आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्याला ज्येष्ठांचं सभागृह असंही म्हणतात. या सभागृहात विविध क्षेत्रांमधील लोकांचा अनुभव संसद व पर्यायाने देशाला व्हावा यासाठी राष्ट्रपती 12 सदस्यांची नियुक्ती करत असतात. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, कुस्तीपटू दारासिंह, कवी जावेद अख्तर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांनी आजवर राज्यसभेचे सदस्यत्त्व स्विकारले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंह, रघुनाथ महापात्रा यांची नियुक्ती राज्यसभेत केली आहे.


1) राकेश सिन्हा- राकेश सिन्हा हे मूळचे बिहारचे बेगुसराईचे असून त्यांचे शिक्षण पाटणा व रांची येथे झाले. त्यांचे अनेक लेख जनसत्ता, हिंदुस्तान, दिनमान, रविवार, ऑर्गनायझर, पांचजन्य व अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असून इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद संचालक आहेत. टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू मांडली आहे.



2)सोनल मानसिंह- सोनल मानसिंह या शास्त्रीय नृत्यअभ्यासक नृत्यांगना असून भरतनाट्यम व ओडिसी नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आई गुजरातमधील एक ख्यातनाम समाजसेविका होत्या तर आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यपाल होते. मानसिंह यांनी मणिपुरी नृत्यापासून आपल्या शिक्षणाची नागपूरयेथून सुरुवात केली. त्यांनी संस्कृत भाषेतील प्रवीण व कोविद या पदव्या संपादन केल्या आहेत. 1962 साली त्यांनी नृत्यातील करिअरला सुरुवात केली. त्यांना पद्मभूषण, संगीत-नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ नृत्यसेवेबद्दल दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्यांच्यावर सोनल नावाचा माहितीपटही प्रसिद्ध केला आहे.



3) रघुनाथ महापात्रा- रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि शिल्पविशारद आहेत. त्यांचा जन्म 23 मार्च 1943 साली झाला. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकला क्षेत्र तसेच कलाशिक्षणामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

4) राम शकल- राम शकल हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते माजी खासदार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज मतदारसंघातून तीनवेळा लोकसभेत निवडून गेले होते.

Web Title: Who is the President appointed by the President, Sinha, Mansingh, Shakal, Mahapatra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.