कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:44 PM2022-05-28T12:44:14+5:302022-05-28T12:44:47+5:30

Amreena Bhat : काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला.

Who she social media artist Amreena Bhat? | कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

Next

गेल्या बुधवारी काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीना भट (Amreena Bhat) ची गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी अमरीनाचा १० वर्षीय भाचाही जखमी झाला होता. अमरीना भट व्यवसायाने टीव्ही अभिनेत्री आणि यूट्यूबर होती. ती काश्मीरमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. बुधवारी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हा दुसरा हल्ला होता. ज्यात टार्गेट किलिंग केलं गेलं. 

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात अमरीना गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुदैवाने या हल्ल्यातून तिच्या परिवारातील लोक सुरक्षित वाचले. त्यानंतर सेना आणि पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अमरीना भट अभिनेत्री असण्यासोबतच काश्मीरी फोक सिंगरही होती. अभिनेत्री म्हणून तिने अनेक लोकल काश्मीरी शोज केले होते. अमरीनाचे काश्मीरी फोक सॉंग गाजले होते. अमरीना टिकटॉकवरही खूप प्रसिद्ध होती. त्यासोबतच ती YouTube Shorts आणि Instagram Reels सुद्धा बनवत होती. सोशल मीडियावर ती तिचे व्हिडीओ शेअर करत होत. 

अमरीना भटचं एक यूट्यूब चॅनलही आहे. ज्याचं नाव Amreena bhat official आहे. या चॅनलला साधारण १५.१ के सब्सक्राइबर्सही आहेत. तिने तिचे २२ व्हिडीओ अपलोड केले आहेत. अमरीनाने २० मे रोजी एक ड्रामा व्हिडीओ अपलोड केला होता. ज्याला ४३, ६९६ व्ह्यूज मिळाले. 

अमरीना भटचं काश्मीरी फोक सॉंग 'Balan Cheye' सुपर-डुपर हिट होतं. हे यूट्यूब वर टॉप ट्रेंडिंगमध्ये होतं. या गाण्याने अमरीनाला काश्मीरमध्ये खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यासोबतच अमीरनाचं 'Rinda Ho' सॉन्गही हिट झालं होतं.
याआधी मंगळवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सौरा भागात पोलीस कॉन्स्टेबल सैफुल्ला कादरीची त्याच्या घरात घुसून हत्या केली होती. त्यावेळी कॉन्स्टेबल कादरी त्याच्या मुलीला ट्यूशनला सोडण्यासाठी जात होता. यावेळी त्यांची ७ वर्षीय मुलगी जखमी झाली. 
 

Web Title: Who she social media artist Amreena Bhat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.