विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:44 PM2024-01-17T14:44:08+5:302024-01-17T14:45:43+5:30
महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे.
आजकाल विश्वास कोणावर ठेवावा हा एक मोठा प्रश्नच आहे. बिहारमध्ये अशी घटना घडलीय की वाचून धक्काच बसेल. भाडेकरू म्हणून ठेवलेल्या शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवून नेले आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील ही घटना आहे. आता या महिला पोलिसाला त्या तरुणीवर विश्वास ठेवून तिला रुम का दिला याचा पश्चाताप होत आहे.
महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ही तरुणी तिच्या पतीलाच घेऊन पसार झाली आहे. खूप शोधाशोध केली तरी पती सापडला नाही म्हणून अखेर महिला पोलिसाने पोलिसांत तक्रार दिली आहे.
महिला पोलिसाचा पती अचानक गायब झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. लहेरियासराय पोलीस ठाणे क्षेत्रात ती राहत होती. तिचा दोन वर्षांची मुलगी देखील आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीला या महिला पोलिसाचे गाव आहे. तेथील एक मुलगी बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी आली होती. तिला या महिला पोलिसाने आपल्याच घरात रुम भाड्याने दिला होता.
त्या तरुणीने परीक्षा पास केली, शिक्षिकाही झाली. एका माध्यमिक शाळेत तिची नियुक्ती झाली. इथपर्यंत सर्व ठीक चालले होते. महिला पोलिसाला तिचा पती आणि शिक्षिकेत काही गुटुर्गु चालले असल्याची शंकाही या दोघांनी येऊ दिली नाही. शिक्षिकेला नोकरीला लागून एक महिना होत नाही तोच दोघेही गायब झाले. ती गेली तेव्हा पासून महिला पोलिसाचा पती देखील घरी आला नाही. त्याच्या मित्रपरिवार, कुटुंबीयांकडे चौकशी केली परंतु काही पत्ता लागला नाही.
पतीला अनेकदा फोन केला, एकदा त्याने उचलला आणि घटस्फोट घेण्याचे बोलला. तेव्हा महिला पोलिसाच्या पायाखालची वाळू सरकली. आता या महिला पोलिसाचा कोणावरच विश्वास राहिला नसल्याचे म्हणणे आहे. पोलीस तपास करत आहेत.