खडसे यांचा निशाना कोणत्या आमदारावर बोगस कर्ज प्रकरण : रोख कुणावर गुलाबरावांवर की सतीश पाटलांवर
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:20+5:302016-04-26T00:16:20+5:30
जळगाव : जिल्हा बँकेतील २०० कोटींच्या बोगस कर्जवाटपात एका आमदाराने लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. खडसे यांनी या आमदाराचे नाव घेणे टाळल्याने एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील या घोटाळ्यातील लाभार्थी आमदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
Next
ज गाव : जिल्हा बँकेतील २०० कोटींच्या बोगस कर्जवाटपात एका आमदाराने लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. खडसे यांनी या आमदाराचे नाव घेणे टाळल्याने एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील या घोटाळ्यातील लाभार्थी आमदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.गुलाबराव पाटील की डॉ.सतीश पाटीलखडसे यांनी एरंडोल आणि धरणगाव तालुक्यात हा घोटाळा झाल्याचे सांगितले. सध्या एरंडोलचे आमदार डॉ.सतीश पाटील आहेत. तर धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गुलाबराव व पालकमंत्री खडसे यांच्यातील आरोपप्रत्यारोप सुरुच आहेत. गेल्या आठवड्यात गटसचिवांना निलंबित केले तसेच पीक कर्जाच्या वाटपावरून आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना धारेवर धरले होते. तर जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदीसाठी निविदेद्वारे भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबा परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे खडसेंचा रोख नेमका कुणावर याबाबत उत्सुकता आहे.आक्रमक खडसेंनी नाव घेणे टाळलेघरकूल प्रकरण, जामनेर येथील सागवान प्रकरण तसेच आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या विरोधातील प्रकरण असो या सर्व प्रकरणात पालकमंत्री खडसे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याचे संकेत दिले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्यात घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री खडसे यांनी चाळीसगाव येथील कार्यक्रमात डॉ.सतीश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार डॉ.सतीश पाटील यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला. डॉ.सतीश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत खडसे यांनी बोलून दाखविल्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. विरोधात बोलले किंवा काम केल्यानंतर खडसे सांगतात त्यानुसार गुन्हे दाखल होत असल्याचा संदेश बाहेर जात आहे. त्यामुळे कदाचित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खडसे यांनी त्या आमदाराचे नाव घेणे टाळले असावे.