'लेडी डॉन' बनून मुख्यमंत्री योगींना उडवण्याची धमकी कोणी दिली?, तपासात नाव आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:48 PM2022-06-24T18:48:19+5:302022-06-24T18:49:44+5:30
Yogi adityanath : 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.
यानंतर गोरखपूरच्या ठाणे कॅन्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की, ज्याने ट्विट करून धमकी दिली होती तो फिरोजाबादचा राहणारा सोनू नावाचा गुन्हेगार असून तो आग्रा तुरुंगात बंद आहे. या ट्विटमध्ये हापूर पोलिसांना टॅग करण्यात आले होते. 'लेडी डोनट' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून मेरठ आणि लखनऊमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याही आल्या होत्या.
या ट्विटनंतर सर्वेलन्स टीम या प्रकरणाचा तपास करत होती. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये ओवेसी तर मोहरा आहे, खरे लक्ष्य तर योगी आदित्यनाथ आहेत, असे लिहिले होते. भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार आहे. लखनौ रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर बॉम्ब पेरण्याची आणि मेरठमध्ये 10 बॉम्बस्फोटाबाबत चर्चा झाली होती.
हापूर पोलीस या ट्विटची चौकशी करत होते, त्यानंतर काही वेळाने आणखी एक ट्विट करण्यात आले, ज्यामध्ये भीम आर्मीच्या प्रदेशाध्यक्ष सीमा सिंह यांना मानवी बॉम्बने उडवणार असल्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांबाबतही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. हे ट्विट नंतर हटवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
सिद्धू मूसेवाला प्रकरणातील चौकशीत उघडकीस आली मोठा खुलासा, हत्येनंतर कोणाला दिली होती शस्त्रांची बॅग
या प्रकरणाच्या तपासात सोनू सिंग याने ही धमकी दिली असून तो फिरोजाबादमधील सिरसागंज पोलीस ठाण्यातील अहमदपूरचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनू सध्या आग्रा तुरुंगात आहे. या प्रकरणाबाबत, त्याला आग्रा येथून गोरखपूर न्यायालयात वॉरंट बी अंतर्गत हजर करण्यात आले, तेथून त्याला रिमांडवर कारागृहात पाठवण्यात आले.