टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:27 PM2019-05-30T12:27:08+5:302019-05-30T12:29:20+5:30

शपथ सोहळ्याला बॉलिवूड, खेळ आणि उद्योगजगतातील बड्या हस्तींना निमंत्रण देण्यात आले आहे.

who will be Modi's swearing-in ceremony invitees Tata, Ambani, Kangana | टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी

Next

नवी दिल्ली : भाजपाची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आल्यानंतर आज सायंकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथ सोहळ्याला बॉलिवूड, खेळ आणि उद्योगजगतातील बड्या हस्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर या शपथ सोहळ्याला तब्बल 8 हजार लोकांना बोलविण्यात आले आहे. हा सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. 


उद्योगजगतातून मुकेश अंबानी, रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि आनंद महिंद्रा यांना बोलावण्यात आले आहे. याशिवाय आरपीजी ग्रुपचे प्रमुख हर्ष गोएंका आणि गोदरेजचे अध्यक्ष आदि गोदरेज यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. मात्र, गोएंका आणि गोदरेज भारतात नसल्याची शक्यता आहे. 


सिनेजगतातून दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, अभिनेत्री कंगना राणावत, शाहरुख खान, संजय लीला भन्साळी, करण जोहर, मधुर भांडारकर, आनंद एल राय, सिद्धार्थ रॉय कपूर, अशोक पंडित, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय सहभागी होण्याची शक्यता आहे. 


क्रीडाजगतातून पीटी ऊषा, पी गोपीचंद यांच्यासह माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड़, अनिल कुंबळे, हरभजन सिंह, सायना नेहवाल आदी उपस्थित राहणार आहेत. 


राजकीय क्षेत्रातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्यासह बिगर भाजपा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, तेलंगाणाचे के चंद्रशेखर राव, आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. 

Web Title: who will be Modi's swearing-in ceremony invitees Tata, Ambani, Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.