उत्तर प्रदेशात कोण ठरणार 'रईस', 'दंगल' सुरुच
By admin | Published: January 2, 2017 11:41 AM2017-01-02T11:41:10+5:302017-01-02T12:33:06+5:30
येत्या निवडणूका लक्षात घेता मुलायम सिंह यादव यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता-पुत्रातील दिलजमाई औटघटकेची ठरली असून, पक्षांतर्गत वैध-अवैधतेची तथा निलंबन-हकालपट्टीची दंगल पुन्हा सुरू झाली आहे. येत्या निवडणूका लक्षात घेता मुलायम सिंह यादव यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पक्षाच्या चिन्हं असलेल्या सायकलसाठी आता ही दंगल सुरु झाल्याचं दिसत आहे. मुलायम सिंह पक्षाचं चिन्ह असलेल्या सायकलबद्दल निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत. पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेल अमर सिंहदेखील लंडनमधून परतले असून मुलायम सिंहांसोबत निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे.
मुलायम सिंह यादव सहजासहजी पक्षाचं चिन्ह सोडण्यास तयार नसून ही माझी ओळख असल्याचं बोलले आहेत. मुलायम सिंह यांचे बंधू शिवपाल राजधानीतच पोहोचले आहेत. नेताजी पक्षाचे अध्यक्ष असून भविष्यातही तेच राहणार आहेत. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी नेताजींसोबन असेन असं शिवपाल यादव बोलले आहेत.
Samajwadi Party's election symbol is my signature: Mulayam Singh Yadav pic.twitter.com/Xc46bk9oYo
— ANI UP (@ANINewsUP) 2 January 2017
पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे अधिवेशनच मुलायम यांनी अवैध ठरविले. विनापरवानगी अधिवेशन घेणारे सपाचे महासचिव रामगोपाल यादव, पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि महासचिव नरेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Netaji iss samay rashtriya adhyaksha hai, aage bhi rahenge. Hum netaji ke sath marte dum tak rahenge:Shivpal Yadav arrives in Delhi #SPfeudpic.twitter.com/OM8Ag8D5f0
— ANI UP (@ANINewsUP) 2 January 2017
रामगोपाल यादव यांनी बोलविलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांना सपाचे अध्यक्ष बनवून मुलायम सिंह यांना पक्षाचे सर्वोच्च नेते बनविण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला होताच अधिवेशनात अमर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली; शिवाय शिवपाल यादव यांनाही प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करून त्यांच्या जागी नरेश उत्तम पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले.
मात्र, हे अधिवशेन अवैध असून, जे नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुलायम सिंह यांनी दिला आहे. सर्व गैरसमज दूर करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ५ जानेवारीला बोलविण्यात आले होते. मात्र हे अधिवेशनदेखील लांबणीवर टाकण्यात आल्याच शिवपाल यादव यांनी सांगितलं आहे.
Mulayam Singh ji ne ek baar kaha tha Amar Singh humare dal mein nahin, dil mein hain: Amar Singh #SPfeudpic.twitter.com/qAB0tQIvLz
— ANI UP (@ANINewsUP) 2 January 2017
नेताजींसाठी मी सर्वकाही करेन
नेताजींनी (मुलायम सिंह) मला सांगितले असते तर मी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदावरून स्वत:हून दूर झालो असतो. पक्ष किंवा नेताजींविरुद्ध काही कारस्थान शिजत असेल तर त्याविरुद्ध पावले उचलणे हे माझे कर्तव्य आहे. मी नेताजींचा मुलगा आहे व त्या नात्यात कोणी वितुष्ट आणू शकत नाही. नेताजी आणि पक्षाच्या रक्षणासाठी जे करावे लागेल ते सर्व मी करेन.
- अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उ.प्र. (कार्यकर्त्यांसमोर बोलताना)