कोण करणार मोदींच्या या 'सरकारी' दौऱ्यांचा खर्च?; कारण, कार्य होतंय घरचं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:23 PM2019-02-13T22:23:33+5:302019-02-13T22:24:10+5:30
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेस दौरे बंद झाले आहेत. मात्र, मोदींची देशातील भ्रमंती सुरू आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मोदींचे परदेश दौरे जरी बंद झाले असले, तरी मोदींच्या देशांतर्गत दौऱ्यामध्ये सातत्य जाणवत आहे. 1 जानेवारी 12 जानेवारी या 42 दिवसांत मोदींनी तब्बल 27 दौरे केले आहेत. त्यामध्ये 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश दौरे हे भाजपाच्या प्रचार किंवा पक्षासाठी केलेलेच दौरे आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेस दौरे बंद झाले आहेत. मात्र, मोदींची देशातील भ्रमंती सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, पक्षासाठी मोठ्या-मोठ्या सभांना संबोधणे, पक्षाच्या प्रचारार्थ रॅली काढणे यासाठी मोदी सध्या देशांतर्गत दौऱ्यावर असल्याचं दिसत आहे. मात्र, मोदींच्या या दिल्ली टू ... राज्यातील खर्च कोण करतेय हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोदींचे हे दौरे भाजापा हिताचे असून देशाहित किंवा विकासाठी या दौऱ्याचाही अपवाद वगळता काहीही उपयोग होणार नाही. पण, मोदींच्या देशांतर्गत दौऱ्यांसंदर्भातील खर्चाची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. प्रोटोकॉलला धरून हा विषय येत नाही, त्यामुळे या खर्चाची माहिती देण्यास पीएमओ कार्यालयाने नकार दिला.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत 565 दिवस प्रवासदौरा केला आहे. तर, मनमोहन सिंग पहिल्या 5 वर्षात 368 दिवस दौरा केला आहे. त्यामुळे मनमोहनसिंग यांच्यापेक्षा मोदींचे कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त होणाऱ्या दौऱ्यांच प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तर चालू 2019 या वर्षात मोदींनी 27 दौरे केले आहेत.