इंदिरा गांधींनी लढलेला ‘मेडक’ कोण जिंकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:22 AM2024-05-09T08:22:28+5:302024-05-09T08:22:39+5:30

धर्मराज हल्लाळे लोकमत न्यूज नेटवर्क मेडक : १९८० मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी लोकसभेची निवडणूक मेडकमधून लढविली. ...

Who will win 'Medak' contested by Indira Gandhi? | इंदिरा गांधींनी लढलेला ‘मेडक’ कोण जिंकणार ?

इंदिरा गांधींनी लढलेला ‘मेडक’ कोण जिंकणार ?

धर्मराज हल्लाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडक : १९८० मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी लोकसभेची निवडणूक मेडकमधून लढविली. त्याअर्थाने तेलंगणातील लक्षवेधी जागांपैकी मेडक काबिज करण्यासाठी बीआरएस, काँग्रेस आणि भाजपात मोठी स्पर्धा आहे.

मेडकमध्ये ४४ उमेदवार रिंगणात असून, लढत तिरंगी होईल. त्यातही खरी रस्सीखेच बीआरएसचे वेंकटराम रेड्डी आणि काँग्रेसचे निलम मधू यांच्यात दिसत आहे. रेड्डी हे विधानपरिषदेवर आमदार आणि माजी सनदी अधिकारी आहेत. सिद्धीपेठचे ते जिल्हाधिकारी होते. २०१९ च्या निकालात भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होती. तर १९९९ पासून लोकसभेत पराभवाचा सामना केलेल्या काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर विजयाचे डाव टाकले आहेत. तर दोघांच्या लढाईत भाजपाचे एम. रघुनंदन राव हे विजयासाठी अंतिम  टप्प्यात प्रचार टोकदार करीत आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे...
मेडकमधील औषधी आणि इतर रासायनिक उद्योगांमुळे होणाऱ्या जल, वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. 
असूविंधामुळे उद्योगांचे स्थलांतर, रोजगार प्रश्नावर काँग्रेस, भाजपा बीआरएसला कोंडीत पकडत आहे.
जिल्हाधिकारी राहिलेल्या वेंकटराम यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १०० कोटींचा ट्रस्ट उभारण्याची केलेली घोषणा तरुणांमध्ये चर्चेचा विषय आहे. 

२०१९ मध्ये काय झाले?
कोठा प्रभाकर रेड्डी
टीआरएस (विजयी)
५,९६,०४८

गली अनिल कुमार
काँग्रेस
२,७९,६२१

Web Title: Who will win 'Medak' contested by Indira Gandhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medak-pcमेडक