भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 09:57 PM2019-11-10T21:57:09+5:302019-11-10T22:00:14+5:30

अयोध्या निकालानंतर अजित डोवाल यांच्याकडे सर्वधर्मियांनी बैठक; परस्पर बंधुता टिकवून ठेवण्याचे आवाहन

The whole world will be appreciate to india - Swami Chidananda Saraswati | भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती

भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती

Next
ठळक मुद्देसंपूर्ण जग आपल्या देशाचे कौतुक करीत असल्याचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी सांगितले.राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत स्वामी चिदानंद सरस्वती यांनी आज डोवाल यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत स्वामी चिदानंद सरस्वती यांनी आज डोवाल यांची भेट घेतली. त्यावेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रेमाने स्वीकार केला आहे. आम्ही एकत्र आलो आणि यशस्वी झालो. मला माझ्या मुस्लिम बांधवांचे आभार मानायचे आहेत. कोणीही जिंकला नाही किंवा हरलं नाही. संपूर्ण जग आपल्या देशाचे कौतुक करीत असल्याचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी सांगितले.

अयोध्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद, स्वामी अवधेशानंद, शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाद आणि अन्य धार्मिक नेत्यांची रविवारी दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असणार्‍या सर्वधर्मीय मान्यवरांनी देशातील आणि बाहेरील काही देशद्रोही घटक आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे नुकसान करण्यासाठी परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात या निर्णयाशी सहमती दर्शविली आहे. या बैठकीत सर्व समाजात परस्पर बंधुतेची भावना कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. 

Web Title: The whole world will be appreciate to india - Swami Chidananda Saraswati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.