अब की बार सामान्यांच्या खिशावर भार! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:42 PM2021-05-17T17:42:04+5:302021-05-17T17:48:28+5:30

Wholesale Price Based Inflation At 10.49% in April : घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे.

Wholesale price based inflation at 10.49% in April, against 7.39 % in March: Govt of India | अब की बार सामान्यांच्या खिशावर भार! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार

अब की बार सामान्यांच्या खिशावर भार! घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांच्या पार

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, बेड्सची कमतरता अशा अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. हातवरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 7.39 टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये या दराने रेकॉर्ड मोडला आहे. महागाई दर तब्बल 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांची आकडेवारी दिली आहे. फेब्रुवारीत महागाई दर 4.83 टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर  2.56 टक्क्यांनी वाढला आणि 7.39 टक्क्यांवर पोहोचला. तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर 3.1 टक्क्यांनी वाढला असून तो आता 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. डाळी, फळं, अंडी-मांस, पेट्रोल आणि एलपीजी यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Wholesale price based inflation at 10.49% in April, against 7.39 % in March: Govt of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.