किसका साथ किसका विकास ? ज्योतीरादित्य सिंधियांचा भाजपाला सवाल
By admin | Published: February 24, 2016 03:52 PM2016-02-24T15:52:37+5:302016-02-24T15:52:37+5:30
लोकसभेत आज जेएनयू आणि रोहीत वेमुला प्रकरणावरुन काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिंया यांनी किसका साथ किसका विकास प्रश्न विचारत भाजपावर जोरदार टीका केली
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २४ - लोकसभेत आज जेएनयू आणि रोहीत वेमुला प्रकरणावरुन काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिंया यांनी किसका साथ किसका विकास प्रश्न विचारत भाजपावर जोरदार टीका केली. रोहीत वेमुलावर कारवाई करण्यासाठी कुलगुरुंवर भाजपाचा दबाव होता असा आरोप ज्योतीरादित्य सिंधिया यांनी केला आहे.
जेएनयू प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधत राजनाथ सिंग यांनी जेएनयू वादाचं कनेक्शन हाफीज सईदशी कोणत्या आधारे जोडल ? हा प्रश्न उपस्थित केला. देशविरोधी घोषणांचं कोणीच समर्थन करत नाही मात्र फक्त घोषणा दिल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही असंही ज्योतीरादित्य सिंधिया म्हणालेत. नथुराम गोडसेंचा जयजयकार करणा-यांविरोधा देशद्रोहाचा गुन्हा का नाही ? असा प्रश्नही ज्योतारादित्य सिंधिया यांनी विचारला. जेएनयूला सरकार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ५३ वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर भारताचा झेंडा नाही फडकला आणि आता विद्यापीठांवर झेंडा फडकवत आहे म्हणत सरकारच्या विद्यापीठांवर झेंडा फडकवण्याचा निर्णयाचा विरोधदेखील केला आहे.