'या'मुळे कोरोनाग्रस्तांमध्ये दिसत नाहीत लक्षणे, अशा लोकांना पटकन होते व्हायरसची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:32 PM2020-04-23T14:32:40+5:302020-04-23T14:55:22+5:30
या अभ्यासानुसार, संक्रमणानंतर केवळ 14 टक्के लोकांमध्येच अधिक प्रमाणावर अँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले. तर 40 टक्के लोकांमध्ये मध्यम प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपिड किट खराब निघाल्या आहेत. त्यांचा उपयोग शरीरात अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी केला जातो. शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजसंदर्भात नुकताच एक रिसर्च रिपोर्ट समोर आला आहे. यात, ज्या लोकांमध्ये कमी प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात, त्यांना पुन्हा कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच, कोरोनाग्रस्त लोकांमध्ये 7 ते 10 दिवसांत अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, असेही सांगण्यात आले आहे. अनेकदा लोकांमध्ये याचे प्रमाण एवढे कमी असते, की त्याचा शोधच लागत नाही आणि हीच कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपुढची समस्या आहे.
या अभ्यासानुसार, संक्रमणानंतर केवळ 14 टक्के लोकांमध्येच अधिक प्रमाणावर अँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले आहे. 40 टक्के लोकांमध्ये मध्यम प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या, तर 30 टक्के लोकमध्ये त्या क्वचितच तयार झाल्या आणि त्यांची रोगप्रतिकारशक्तीही अत्यंत कमी होती. अभ्यासकांच्या मते, अंटीबॉडी तयार करण्याची कमी क्षमता असणाऱ्यांमध्ये संक्रमणांची ओळख होणे अवघड आहे. ही माहिती फुदान यूनिव्हर्सिटीच्या संशोधनातून समोर आली आहे.
अँटीबॉडी टेस्टमुळे केवळ एखादी व्यक्ती संक्रमित असू शकते, एवढेच समजते. भारतात सध्या केवळ हॉट स्पॉट भागांतच, अशा प्रकारची तपासणी केली जात आहे. यावरून संबंधित भागात संक्रमित लोकांची संख्या वाढेल, की नाही. एवढेच कळू शकते. जर या तपासणीत, जास्तीत जास्त लोकांमध्ये अँटीबॉडीज कमी तयार होणे अथवा तयार होताना दिसल्या नाही तर, याचा अर्थ तेथील लोक या व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतात असा होतो.
कोरोनाची लक्षणे दिसने हे संबंधित व्यक्तीचे वय आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवरही अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीची रोगप्रिकारशक्ती चांगली असेल आणि व्हायरस कमी असेल तर, अशा व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे दिसणार नाहीत. तेसेच ज्यांना बऱ्याच दिवसांपासून सर्दी-ताप असेल आणि जे कुठले ना कुठले औषधी घेत असतील, तर त्यांच्यातही लक्षणे फार कमीच जाणवतील. या संशोधनातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 20 ते 42 वर्षांच्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. यामुळेच यांच्यात या व्हायरसची लक्षणे कमी प्रमाणात आढळतात. तर वृद्धांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या व्हायरसची लागण चटकन होते.
विशेष म्हणजे युवकांच्या तुलने वृद्ध आणि मध्यम वयो गटातील लोकांमध्ये अंटीबॉडी वेगने तयार झाल्या आहेत. याचाच अर्थ असाही आहे, की व्हायरसचा हल्ला होतात त्यांच्यात शरीरात वेगाने अंटीबॉडीज बनायला सुरुवात झाली.