Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 10:01 AM2021-07-14T10:01:55+5:302021-07-14T10:02:39+5:30
Coronavirus : मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसर्या लाटेची चर्चा आहे. 4 जुलैला कोरोनाची तिसऱ्या लाट ठोठावल्याचा दावा, गेल्या सोमवारी एका नामांकित भौतिकशास्त्रज्ञाने असा दावाही केला होता. दरम्यान, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, सरकार सतत सांगत आहे की, लोकांनी अजूनही कोरोना अॅप्रोप्रिएट बिव्हेवियर ठेवावे. असे न केल्यास कोरोना विरोधातील लढ्यात आतापर्यंत मिळविलेले यश वाया जाईल. कोरोना पुन्हा रोखण्यासाठी, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालण करणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात सांगण्यात आले असले तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. लोक मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे, मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.
'ही' आहेत कारणे...
1) लोकांचे मास्क न लावण्याचे पहिले कारण श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, मास्क लावण्यानंतर त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे ते मास्क लावत नाहीत.
2) लोकांचे मास्क न लावण्याचे दुसरे कारण अस्वस्थतेशी संबंधित आहे. मास्क लावल्यामुळे त्यांना 'अस्वस्थ' किंवा 'अनकम्फर्टेबल' वाटते. मास्क लावल्यानंतर आराम वाटत नाही.
3) तिसरे कारण म्हणजे बऱ्याच लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण ते सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे त्यांना मास्क लावण्याची जास्त गरज वाटत नाही.
डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता https://t.co/rhQ0enylz6#coronavirus#Delta
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
सरकारची चिंता वाढली
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा लोक गांभीर्याने घेत नाहीत. मंत्रालय वारंवार सांगत आहे की कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले नाही तर तिसरी लाट येऊ शकते. कोरोनावरील निर्बंध कमी केल्यानंतर बाजारपेठ आणि हिलस्टेशन्सवरील लोकांची गर्दी पाहून सरकारची चिंता वाढली आहे. अशा ठिकाणी लोक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाहीत किंवा मास्क लावत नाहीत. जर लोकांचे वागणे असेच राहिले तर निर्बंधामध्ये दिलेली शिथिलता मागे घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.
कांवड यात्रा रद्द
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखोंच्या गर्दीत कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे अशक्य आहे. कांवड यात्रा सुपरप्रेडर होऊ शकते अशी भीती आहे, असे येथील राज्य सरकारने म्हटले आहे. तर यूपी सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.